
आपला शेजारी पाकिस्तानच्या डीजिटल प्रगतीत मोठी भूमिका निभावल्यानंतर टेक जगताली दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने अचानक पाकिस्तानातून आपला गाशा गुंडाळत टाटा बाय बाय केले आहे. ३ जुलै २०२५ रोजी मायक्रोसॉफ्टने कोणतीही अधिकृत घोषणा न करता पाकिस्तानातील तिचे ऑपरेशन बंद केले आहे. ही माहीती मायक्रोसॉफ्टचे पाकिस्तानचे आधीचे प्रमुख जाव्वाद रहमान यांनी सोशल मीडियावर ‘एका युगाचा अंत’ अशी पोस्ट करीत दिली आहे.
मायक्रोसॉफ्टने आपल्या निर्णयामागचे कोणतेही अधिकृत कारण सांगितलेले नाही. परंतू या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहीतीनुसार हे पाऊल कंपनीने पाकिस्तानची बिघडती राजकीय घडी आणि आर्थिक स्थितीमुळे उचलले आहे. गेल्या काही वर्षात पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.
परदेशी चलन साठा घटून ११.५ अब्ज डॉलर उरला आहे
२०२४ मध्ये व्यापार तोटा २४.४ अब्ज डॉलरपर्यंत पोहचला
वारंवार सरकारे बदलणे आणि धोरण अस्थिरता
तांत्रिक हार्डवेअरच्या आयातील अडचणी आणि जाचक कर
या सर्वांमुळे कोणत्याही ग्लोबल कंपनीला तेथे टीकून राहणे अवघड बनले असते. त्या सर्व मुद्यांशिवाय कंपनीला गुंतवणूकीपासून फंड ट्रान्सफर आणि आयात आणि निर्यातीत अडचणी येत होत्या.
साल २०१८ मध्ये भारत आणि पाकिस्तानचा व्यापार ३ अब्ज डॉलर होता. तोच आता २०२४ मध्ये घसरुन केवळ १.२ अब्ज डॉलर राहीला आहे. गरजेच्या वस्तूही आता त्रयस्त देशातून मागवाव्या लागत आहेत. ज्यामुळे भांडवल आणि वेळ दोन्ही वाढत आहेत. हे सर्व परदेशी कंपन्यांसाठी हा एक निगेटिव्ह संकेत बनत आहे.
साल २०२२ मध्ये कंपनीने पाकिस्तानात विस्तार करण्याची योजना आखली आहे. परंतू परिस्थिती बिघडल्यानंतर मायक्रोसॉफ्टने व्हीएतनामकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या दोन वर्षात कंपनीने अनेक लोकल पार्टनरशिप्स आणि प्रोग्रॅम्स देखील बंद केले आहेत.