AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड, आता सामना खेळला नाही तर…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली. पहिल्या दिवशी तीन सामना पार पडले. भारताने अमेरिकेशी झालेल्या सामन्यात 29 धावांनी विजय मिळवलं. या विजयासह भारताने पाकिस्तानला धोबीपछाड दिला आहे.

T20 World Cup : टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड, आता सामना खेळला नाही तर...
T20 World Cup : टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड, आता सामना खेळला नाही तर...Image Credit source: BCCI/ICC Twitter
| Updated on: Feb 07, 2026 | 11:15 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने विजयाचा नारळ फोडला. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी झाला, पण हा विजय सहज मिळाला नाही. नाणेफेकीचा कौल गमवला, फलंदाजी फेल गेली. असं असूनही भारताने अमेरिकेला 29 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं. भारताने नुसतं अमेरिकेला हरवलं नाही, तर पाकिस्तानलाही अडचणीत आणलं आहे. त्याचं कारण असं की भारत, पाकिस्तान, नेदरलँड, अमेरिका आणि नामिबिया हे एकाच गटात आहे. प्रत्येक संघ आपल्या गटात चार सामने खेळणार आहे. यापैकी भारत-अमेरिका आणि पाकिस्तान-नेदरलँड यांनी पहिला सामना खेळला आहे. 7 फेब्रुवारीला पाकिस्तान नेदरलँड सामन्याने सुरुवात झाली. पाकिस्तानने हा सामना 3 गडी आणि 3 चेंडू राखून जिंकला. त्यामुळे त्यांना 2 गुण मिळाले आणि नेट रनरेट हा +0.240 इतका राहिला. त्यामुळे पाकिस्तानच्या नजरा या भारताच्या सामन्याकडे होत्या. भारतीय संघाने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवली होती. पण अखेर भारताने विजय मिळवून पाकिस्तानलाही धोबीपछाड दिला आहे.

टी20 वर्ल्डकप ग्रुप ए मध्ये भारताने अमेरिकेला 29 धावांनी पराभूत केल्याने 2 गुण मिळाले. इतकंच काय तर नेट रनरेट हा +1.450 इतका झाला. त्यामुळे या गटात भारताने पहिलं स्थान काबीज केलं आहे. तर पाकिस्तान 2 गुण आणि +0.240 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. आता भारताचा पुढचा सामना नामिबियाशी, तर पाकिस्तानचा अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यात खऱ्या अर्थाने पाकिस्तानचं स्पर्धेतील स्थान कळणार आहे. पाकिस्तानला हा सामना काहीही करून जिंकवाच लागणार आहे. कारण सद्यस्थितीत पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जर ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर भारताला 2 गुणांचा फायदा होईल. इतकंच काय तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान डळमळीत होईल. तसेच अमेरिकेला सुपर 8 फेरीसाठी संधी मिळू शकते.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत अमेरिकेने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे असंच काहीसं या स्पर्धेत घडलं तर पाकिस्तान संघ अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे त्यांना भारताविरुद्ध न खेळण्याचा आपला निर्णय मागे घ्यावा लागू शकतो. भारताविरुद्ध सामना खेळण्याशिवाय त्यांना पर्याय उरणार नाही. नाही तर स्पर्धेतून न खेळताच गाशा गुंडाळावा लागू शकतो. भारत पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला नियोजित आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना