AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 6 मिनिटे अन् अमेरिकेचा खेळ खल्लास… इराणच्या खतरनाक मिसाईलमुळे ट्रम्प चिंतेत

Iran vs USA : अमेरिकेने अनेकदा इराणवर हल्ल्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण आपल्या शस्त्रांसह तयार उभा आहे. इराणचे एक खतरनाक मिसाईल अमेरिकेची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे.

फक्त 6 मिनिटे अन् अमेरिकेचा खेळ खल्लास... इराणच्या खतरनाक मिसाईलमुळे ट्रम्प चिंतेत
Iran vs US TensionImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 07, 2026 | 10:48 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. अमेरिकेने अनेकदा इराणवर हल्ल्याची धमकी दिली आहे. अशातच आता अणु चर्चेच्या समाप्तीनंतर ट्रम्प यांनी इराणी तेलावर नवीन निर्बंध लादले आहेत. याचाच अर्थ इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण आपल्या शस्त्रांसह तयार उभा आहे. आता खामेनी यांचे धोकादायक क्षेपणास्त्र फताह-1 ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. इराणचा दावा आहे की ते सहा मिनिटांत शत्रूचा नाश करू शकते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेविरुद्ध इराणची तयारी

इराणचे फताह-1 हे क्षेपणास्त्र जगात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. फेब्रुवारी 2026 च्या अलीकडील अहवालांमध्ये आणि मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या काळात इराणने हे शक्तिशाली क्षेपणास्त्र अंडर ग्राऊंड मिलाईल सिटीज मध्ये तैनात केले आहे. हे केवळ एक शस्त्र नाही तर अमेरिका आणि इस्रायलला थेट आणि धोकादायक संदेश आहे. त्यामुळे या दोन्ही देशांची झोप उडाली आहे.

6 मिनिटांचा ‘डेथ वॉरंट’

इराणचा दावा आहे की त्यांचे क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर फक्त 6 ते 7 मिनिटांत इस्रायलच्या कोणत्याही कोपऱ्याला नष्ट करू शकते. इस्रायल आणि इराणमधील अंतर 2000 किमी आहे. या टप्प्यातील टार्गेट हे क्षेपणास्त्र क्षणात नष्ट करू शकते. याचा अर्थ हे मिसाईल मध्य पूर्वेतील जवळजवळ सर्व ठिकाणी हल्ला करू शकते. अमेरिकेने जिथे लष्करी तळ स्थापन केले आहेत ती ठिकाणे इराण क्षणात नष्ट करू शकते. ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायलवरही हे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते.

इराणचा गंभीर इशारा

इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे की जर अमेरिकेने हल्ला केला तर आखाती देशांमध्ये (कुवैत, कतार आणि युएई) असलेले अमेरिकन लष्करी तळ आमच्या निशाण्यावर असतील. कतारचा अल-उदेद हवाई तळ हा सर्वात मोठा अमेरिकन तळ या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे. आता इराणच्या या इशाऱ्यानंतर अमेरिका याबाबत काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...