AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunday Mega block Alert : करीरोड, चिंचपोकळी, मस्जिद, सँडहर्स्ट रोड, विलेपार्ले, राम मंदिर स्थानकावर थांबा रद्द

मुंबईकरांनो लक्ष द्या, संडे मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या करीरोड,चिंचपोकळी, मस्जिद, सँडहर्स्ट रोड, विलेपार्ले, राम मंदिर स्थानकावर लोकलना थांबा मिळणार नाही. हार्बर मार्गावरील लोकल बंद असणार आहेत.तसेच वेस्टर्न रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होणार असल्याने मुंबईकरांची कोंडी होणार आहे.

Sunday Mega block Alert : करीरोड, चिंचपोकळी, मस्जिद, सँडहर्स्ट रोड, विलेपार्ले, राम मंदिर स्थानकावर थांबा रद्द
sunday mega block news
| Updated on: Feb 07, 2026 | 10:33 PM
Share

मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रुळांच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी उद्या रविवार ८ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर केलेला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या करी रोड, चिंचपोकळी, मशीद, सँडहर्स्ट रोड आणि पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले, राममंदिर रेल्वे स्थानकांवर लोकल थांबा देण्यात येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वे – मुख्य मार्ग

कुठे : सीएसएमटी आणि विद्याविहार दरम्यान मेगाब्लॉक

वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ दरम्यान

परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ वा.ते दुपारी ३.४५ वा. दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या लोकल विद्याविहार स्थानकानंतर जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान

वेळ : सकाळी ११.०५ वा. ते दुपारी ४.०५ वा. दरम्यान

परिणाम : हार्बर मार्गावरील पनवेलहून सकाळी १०.३३ वा. ते दुपारी ३.४९ वा. दरम्यान सीएसएमटीला जाणाऱ्या अप लोकल आणि सीएसएमटीहून सकाळी ९.४५ वा. ते दुपारी ३.१२ वा. दरम्यान बेलापूर /पनवेलला जाणाऱ्या डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलहून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ दरम्यान ठाण्याला जाणाऱ्या आणि ठाण्याहून सकाळी १०.०१ वा. ते दुपारी ३.२० वा.दरम्यान लोकल बंद राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ स्थानकांदरम्यान गोरेगाव

वेळ : सकाळी १० ते दुपारी ३.०० वा.

परिणाम: सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान लोकल सेवा जलद मार्गावर चालवण्यात येईल. बोरिवली, अंधेरीहून काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत धावतील.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?