आता हेच बाकी होतं… कंडोम पण महागणार? मध्य-पूर्वेतील युद्धाचा मोठा परिणाम, मोठी अपडेट काय?
Condom Price Hike: मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे पेट्रोल, डिझेलच नाही तर नैसर्गिक वायू सुद्धा महागला आहे. इतर अनेक वस्तू महागल्या आहेत. एलपीजी आणि सीएनजी महागला आहे. आता या यादीत अजून एका वस्तूची भर पडली आहे. मॅनकाईंड फार्मा कंपनीने लोकप्रिय ब्रँड मॅनफोर्सचा भाव वाढ होण्याची शक्यता आहे.

Condom Price Hike: आखाती देशातील संघर्षाचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर जाणवत आहे. इंधन तेलाच्या किंमती वाढल्याने दळणवळणाचा खर्च वाढला आणि रोजच्या, दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू महागल्या आहेत. आता महागाईची झळ ही देशातील सर्वात मोठी कंडोम उत्पादक कंपनी मॅनकाईंड फार्मालाही बसली आहे. मॅनफोर्स ब्रँड नावाने कंडोम तयार करणाऱ्या कंपनीकडे देशाच्या बाजारात जवळपास 30 टक्के वाटा आहे. जर जागतिक बाजारात परिस्थिती अशीच राहिली तर भाव वाढीशिवाय पर्याय उरणार नाही असे कंपनीचे म्हणणे आहे.
मध्य-पूर्वेतील तणावामुळे भडकली महागाई
फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या आखाती देशातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भूराजकीय तणावामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत 50 टक्क्यांच्या जवळपास वाढ झाली आहे. कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या घरात पोहचलेआहे. त्यामुळे पेट्रोलियम कच्चे पदार्थ महागले आहे. यामध्ये खास प्रकारची रसायनं, लुब्रिकेंटपासून ते पॅकेजिंगच्या वस्तूंचा समावेश आहे. कच्चे तेल महागल्याने आता या घटक पदार्थांसाठी अधिक पैसा मोजावा लागेल. त्यामुळे लुब्रिकेंटपासून ते पॅकेजिंगपर्यंत सर्व वस्तू महागण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होऊ शकतो. कंडोमचे पाकिट महाग होऊ शकते.
कंपनीकडे कमी साठा
मॅनकाईंड फार्माच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल अरोडा यांनी याविषयीची माहिती दिली. सध्या कंपनीकडे काही दिवसांचा साठा उपलब्ध आहे. जर हा तणाव वाढला तर तेलाच्या किंमती पुन्हा वाढतील. त्यामुळे खर्च वाढले आणि उत्पादनावर त्याचा परिणाम होईल. त्याचा ग्राहकांवर परिणाम होईल असे कंपनीने सांगितले आहे. किंमत कधी वाढेल याविषयीची माहिती कंपनीने दिली नाही. मॅनकाईंडच्या चौथ्या तिमाहीत कच्चा मालावरील खर्चात कोणतीही मोठी वाढ झाली नाही. सध्या 10 मॅनफोर्स कंडोमचे एक पॅकेट जवळपास 100 ते 150 रुपयांमध्ये येते. हे भारतीय भारतीय बाजारातील सर्वात किफायतशीर पर्यायांपैकी एक आहे. केवळ भारतीय कंडोम इंडस्ट्रीज नाही तर जगातील सर्वात मोठी कंडोम उत्पादक कंपनी मलेशियाची ‘कॅरेक्स’ने (Karex) पण त्यांच्या उत्पादनाचे दर 20 ते 30 टक्के वाढवण्याचे ठरवले आहे.