AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानच्या बहिणीने आजपर्यंत का केलं नाही लग्न? कारण ऐकून बसेल धक्का

शाहरुख खान पेक्षा पाच ते सहा वर्षांनी मोठी असलेल्या शाहरुख खानच्या बहिणीने आजपर्यंत का केलं नाही लग्न? कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का.

शाहरुख खानच्या बहिणीने आजपर्यंत का केलं नाही लग्न? कारण ऐकून बसेल धक्का
| Updated on: May 22, 2026 | 4:46 PM
Share

बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आपल्या अभिनय, स्टाइल आणि स्टारडममुळे जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, त्याच्या आयुष्यातील खरी ताकद त्याच्या कुटुंबात दडलेली आहे. विशेषतः त्याची मोठी बहीण शहनाज खान या नेहमीच प्रकाशझोतातून दूर राहूनही संपूर्ण खान कुटुंबाचा मजबूत आधारस्तंभ ठरल्या आहेत.

1960 मध्ये जन्मलेल्या शहनाज या शाहरुख खानपेक्षा सुमारे पाच ते सहा वर्षांनी मोठ्या आहेत. त्या सध्या मुंबईतील मन्नत या शाहरुखच्या आलिशान बंगल्यात शाहरुख, गौरी खान आणि मुलं आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान यांच्यासोबत राहतात.

वडिलांच्या निधनाने आयुष्य बदलले

शाहरुख आणि शहनाज यांचे वडील मीर ताज मोहम्मद खान आणि आई लतीफ फातिमा यांनी मुलांना उत्तम संस्कार दिले. पण 1981 मध्ये वडिलांचे अचानक निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरले. शहनाज या वडिलांच्या अत्यंत जवळ होत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू त्यांच्यासाठी मोठा मानसिक धक्का ठरला.

माहितीनुसार, वडिलांचे पार्थिव पाहताच त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यानंतर जवळपास दोन वर्ष त्या फारशा बोलत नव्हत्या. त्या खोल नैराश्यात गेल्या होत्या. 1991 मध्ये आईच्या निधनानंतर त्यांची मानसिक अवस्था आणखी खालावली.

‘DDLJ’च्या शूटिंगदरम्यान शाहरुखने सोडली शूटिंग

DDLJ च्या शूटिंगदरम्यान शहनाज यांची प्रकृती गंभीर बिघडल्याचे सांगितले जाते. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनीही फारशी आशा नसल्याचे सांगितले होते. त्या काळात शाहरुख खानने शूटिंग थांबवून बहिणीच्या उपचारांना प्राधान्य दिले. त्यांनी त्यांना स्वित्झर्लंडला नेऊन उपचार करून घेतले.

शहनाज खान या अत्यंत हुशार आणि उच्चशिक्षित आहेत. त्यांनी LLB आणि MA पदवी प्राप्त केली आहे. शाहरुख खान अनेक मुलाखतींमध्ये सांगतो की, माझी बहीण माझ्यापेक्षा शंभर पट जास्त बुद्धिमान आहे. तरीही त्यांनी कधीही प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न केला नाही. त्या कायम शांत आणि साधं आयुष्य जगत राहिल्या.

लग्न न करता कुटुंबालाच दिलं आयुष्य

शहनाज यांनी आजपर्यंत लग्न केलेले नाही. आई-वडिलांच्या निधनानंतर आलेल्या मानसिक धक्क्यामुळे त्यांनी संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी वाहून घेतले. त्या आजही ‘मन्नत’मध्ये राहून शाहरुखच्या कुटुंबाची काळजी घेतात.

गौरी खानसोबत त्यांचे अतिशय जवळचे नाते आहे. तसेच आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यावरही त्या मायेचा वर्षाव करतात. अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्या कुटुंबासोबत दिसतात, मात्र माध्यमांपासून कायम दूर राहणेच पसंत करतात.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल