AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भल्या पहाटे माथेफिरूचा रक्तरंजित खेळ; जेलमधून बाहेर येताच बायको-मुलासह 6 जणांना संपवलं

Telangana shocking : तेलंगणामधून धक्कादायक घटना घडली आहे. एकाने सकाळच्या सुमारास 6 जणांची हत्या केली.

भल्या पहाटे माथेफिरूचा रक्तरंजित खेळ; जेलमधून बाहेर येताच बायको-मुलासह 6 जणांना संपवलं
| Updated on: Jul 11, 2026 | 8:20 AM
Share

तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातून माणसुकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील शाबाद मंडलच्या दैवलगुडा गावातील एका तरुणाच्या कृत्याने तेलंगणात खळबळ उडाली आहे. तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर तरुणाने रागाच्या भरात 6 जणांची हत्या केली आहे. त्याने बायको, दोन लहान मुले आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या तिघांची हत्या केली आहे. या हत्याकांडाने संपूर्ण रंगारेड्डी जिल्ह्यात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या माहितीनीनुसार, या रक्तरंजित घटनेमागील कारणही समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय आरोपी राज कुमारच्या विरोधात 16 मे रोजी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्याच्या विरोधात पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली होती. या प्रकरणात राजकुमारला अटक झाली. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात झाली. काही दिवसांपूर्वी राजकुमार हा जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आरोपी राजकुमार बदला घेण्यासाठी पेटून उठला. त्यानंतर राजकुमार हा दैवलगुडा गावात पोहोचला. गावात पोहोचल्यानंतर त्याने 6 जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

राजकुमारने अत्यंत क्रूरपणे 6 जणांवर हल्ला केला. त्याने पॉक्सो प्रकरणातील पीडित, पीडित मुलीची आई, पीडित मुलीची आजी, बायको सरिता, स्वत:ची 3 वर्षांची मुलगी, 2 वर्षांच्या मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. 6 जणांची हत्या केल्यानंतर आरोपी राजकुमार घटनास्थळावरून फरार झाला. फरार होताना त्याने त्याच्या आई-वडिलांकडे फोन दिला. त्याने आई-वडिलांकडे 6 जणांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने आत्महत्या करण्यास जात असल्याचे सांगितले. या माहितीनंतर पोलीस अलर्ट झाली आहे. पोलिसांनी आरोपी राजकुमारचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

पोलीस दलातही खळबळ 

6 जणांच्या हत्येने पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मुख्य पोलीस अधिकारी तरुण जोशी आणि पोलीस अधिकारी योगेश गौतम यांनी पोलिंसाचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची तपासणी केली. त्यानंतर सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपी राजकुमारला अटक करणे आणि त्याची आत्महत्या रोखण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांची सर्व पथके आरोपीच्या मागावस असून त्याचा शोध घेत आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ