AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: महेंद्रसिंह धोनीच्या या चुकीचा चेन्नई सुपर किंग्सला बसला फटका? झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्सचा पत्ता कट झाला आहे. प्लेऑफच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे यंदाचं पर्वही चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी निराशाजनक ठरलं. खासकरून महेंद्रसिंह धोनीमुळे फटका बसला.

IPL 2026: महेंद्रसिंह धोनीच्या या चुकीचा चेन्नई सुपर किंग्सला बसला फटका? झालं असं की...
IPL 2026: महेंद्रसिंह धोनीच्या या चुकीचा चेन्नई सुपर किंग्सला बसला फटका? झालं असं की... Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 22, 2026 | 4:42 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध झाला. या सामन्यात पराभव झाला आणि चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित संपुष्टात आलं. खरं तर पाचवेळा चॅम्पियन्श ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फार अपेक्षा होत्या. मात्र गेल्या काही पर्वात चेन्नई सुपर किंग्सची निराशाजनक कामगिरी सुरू आहे. 2021 मध्ये शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर संघाची जेतेपदाची झोळी रिती आहे. आता चेन्नई सुपर किंग्सचं या पर्वात काय चुकलं? कोणत्या खेळाडूने निराश केलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहे. या पराभवाची कारणमीमांसा करताना एक बाब अधोरेखित झाली की संघ एका खेळाडूशिवाय खेळत होता. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही तर महेंद्रसिंह धोनी होता.

चेन्नई सुपर किंग्सला पाचवेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीकडून या पर्वात फार अपेक्षा होत्या. या पर्वात खेळून संघाच्या कामगिरीत हातभार लावेल असं वाटलं होतं. पण स्पर्धेच्या सुरूवातीपासून शेवटापर्यंत एक कोडं राहिलं. मागच्या पर्वात महेंद्रसिंह धोनीने संघाची धुरा सांभाळली होती. कारण ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली आणि स्पर्धेला मुकला होता. पण या पर्वात ऋतुराज गायकवाड आणि महेंद्रसिंह धोनी हे दोघंही संघात होते. ऋतुराज गायकवाडच्या हाती धुरा होती. पण धोनी एकही सामना खेळला नाही. दुखापतीमुळे धोनी या स्पर्धेत खेळला नाही. स्पर्धेच्या सुरूवातीला त्याच्या पोटरीत दुखापत झाल्याने खेळला नाही. त्यानंतर सर्वकाही  ठीक होतं. मग त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे शेवटपर्यंत खेळला नाही.

चेपॉक स्टेडियममधये शेवटचा सामना खेळेल अशी चर्चा होती. कारण धोनी मैदानात उपस्थित होती. पण तेव्हा फोटोग्राफीपुरता मैदानात उतरला. त्यानंतर गुजरातविरुद्ध शेवटचा सामना खेळेल असं बोललं जात होतं. तेव्हा रांचीला परतला. चेन्नई सुपर किंग्सने धोनीवर अवलंबून राहून चूक तर केली नाही ना? कारण त्याला दुखापत झाल्याने त्याच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूला संधी दिली नाही. या पर्वात त्याची दुखापत कायम राहिली. या स्पर्धेत अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले, पण त्यांची रिप्लेसमेंट त्या त्या संघांना मिळाली. पण धोनीला रिप्लेस केलं गेलं नाही. खरं तर धोनीला आराम दिला असता तरी तो संघासोबत राहू शकला असता. तर एका खेळाडू संघात आला असता तर संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करता आला असता. पण तसं झालं नाही.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल