Ministry of Defence Recruitment 2021: संरक्षण मंत्रालयात 400 जागांवर भरती, पटापट जाणून घ्या

| Updated on: Sep 03, 2021 | 7:38 AM

एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत ऑफलाईन मोडद्वारे पात्र उमेदवार संरक्षण मंत्रालय भरती 2021 साठी अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 400 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Ministry of Defence Recruitment 2021: संरक्षण मंत्रालयात 400 जागांवर भरती, पटापट जाणून घ्या
Ministry of Defence Recruitment 2021
Follow us on

नवी दिल्लीः Ministry of Defence Recruitment 2021: संरक्षण मंत्रालयाने ASC सेंटरसाठी सिव्हिल मोटर ड्रायव्हर, क्लीनर, कुक, एमटीएस आणि इतर पदांसाठी अर्ज मागवलेत. 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2021 पर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार असून, वर्तमानपत्रात या पदांसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आलीय. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत ऑफलाईन मोडद्वारे पात्र उमेदवार संरक्षण मंत्रालय भरती 2021 साठी अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 400 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदांचा तपशील जाणून घ्या

एएससी केंद्र (उत्तर), फक्त पुरुष उमेदवारांसाठी
सिव्हिल मोटर ड्रायव्हर: 115 पदं
क्लिनर: 67 पदं
कुक: 15 पदं
सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर: 3 पदे
एएससी केंद्र (दक्षिण)
कामगार (पुरुष): 193 पदं
एमटीएस (सफाई कर्मचारी): 7 पदे

पात्रता निकष जाणून घ्या

ज्यांनी मान्यताप्राप्त संस्थेतून मॅट्रिक परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत, पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रतेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10602_22_2122b.pdf या लिंकद्वारे अधिसूचना तपासू शकता. जोपर्यंत वयोमर्यादेचा प्रश्न आहे, सिव्हिल मोटर ड्रायव्हर पदासाठी उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षेदरम्यान असावे. तर इतर पदांसाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षेदरम्यान निश्चित करण्यात आलेय. पात्रता निकषांची तपशीलवार माहिती वरील दिलेल्या लिंकद्वारे किंवा रोजगार बातमीद्वारे उमेदवारांना मिळू शकते.

निवड अशी असेल?

कौशल्य / शारीरिक / सराव चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आवश्यक असल्यास लेखी परीक्षा देखील घेतली जाऊ शकते.

याप्रमाणे अर्ज करा

उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अर्जाशी संबंधित सविस्तर माहिती अधिसूचनेद्वारे मिळू शकते.

संबंधित बातम्या

NHPC Recruitment 2021: वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती, त्वरित अर्ज करा

Bank Jobs 2021: साऊथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदावर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

Ministry of Defense Recruitment 2021: Recruitment for 400 posts in the Ministry of Defense