Ambani family wealth: अंबानी कुटुंबात सर्वात श्रीमंत कोण? कोणाकडे सर्वाधिक संपत्ती?

Ambani Family Wealth: रिलायन्सचं साम्राज्य अनेक क्षेत्रात विस्तारलं आहे. पण रिलायन्स समूहात आजच्या घडीला कुणाच्या हाती महत्त्वाची सूत्रं आहेत. कोणाकडे सर्वाधिक संपत्ती आहे? कोणाकडे सर्वाधिक जबाबदारी आहे?

Ambani family wealth: अंबानी कुटुंबात सर्वात श्रीमंत कोण? कोणाकडे सर्वाधिक संपत्ती?
अंबानी कुटुंबात सर्वात श्रीमंत कोण? कोणाकडे सर्वाधिक संपत्ती?
| Updated on: Nov 24, 2026 | 2:10 PM

Ambani Family Wealth: देशातील श्रीमंत कुटुंबात अंबानी कुटुंबाचे नाव सर्वात अगोदर येते. रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह त्यांची मुलंही व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ईशा अंबानीचे नाव सातत्याने पुढे येत असले तरी रिलायन्स समूहात आजच्या घडीला कुणाच्या हाती महत्त्वाची सूत्रं आहेत. कोणाकडे सर्वाधिक संपत्ती आहे? मुकेश अंबानी यांच्यासह कोणाच्या हातात आहेत सर्वाधिक जबाबदारी?

मुकेश अंबानी सर्वात अग्रेसर

Loading...

2026 मध्ये फॉर्च्युन इंडियाने श्रीमंतांची यादी जाहीर केली. त्यानुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती जवळपास 8.6 लाख कोटी रुपये आहे. ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. तर यादीतही त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. शेअर्सची किंमत आणि कंपनीचे मूल्यांकनातील चढउतारामुळे त्यांचे हे स्थान आणि संपत्ती कमी जास्त होते. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतील एक मोठा वाटा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इतर व्यवसायातून येतो. त्यांचा कारभार हा तेल, पेट्रोकेमिकल्सपासून जिओ टेलिकॉम, रिटेल आणि डिजिटल सेवा तसेच आर्थिक सेवांपर्यंत व्यापक झाला आहे. हेच त्यांच्या संपत्तीत भर घालतात.

तीनही मुलांची सरस कामगिरी

संपत्तीचा विचार करता मुकेश अंबानी आघाडीवर असले तरी त्यांच्या मुलांनीही सरस व्यक्तिगत कामगिरी केली आहे. 29 जुलै 2026 रोजीच्या एका अहवालानुसार, अंबानी यांची मुलं अनंत, ईशा आणि आकाश अंबानी हे व्यक्तिगत संपत्ती तयार करण्याच्या यादीत टॉप तीनमध्ये आहेत. या तिघांची प्रत्येकी संपत्ती 2.75 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यामध्ये त्यांच्या अख्त्यारीतील कंपन्यांच्या शेअर्सच्या मुल्याधारित ही संपत्ती आहे.

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी रिलायन्स जिओमध्ये मोठी आणि महत्त्वाची भूमिका निभावत आहे. त्यांच्याकडे टेलिकॉम, इंटरनेट आणि डिजिटल सेवांचा एक मोठा वाटा आहे. जिओचा विस्तार आणि डिजिटल सेवांचा व्याप वाढत आहे आणि देशातील व्यवसायात आकाश अंबानी यांची भूमिका निर्णायक ठरत आहे.

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ही रिलायन्स रिटेल व्यवसायात जबाबदारी सांभाळतात. रिलायन्सचा रिटेलचा कारभार फॅशन, ब्युटी प्रोडक्ट्स, कंझ्युमर गुड्स आणि ई-कॉमर्स सारख्या क्षेत्रात झपाट्याने विस्तारत आहे. ईशा अंबानी सुद्धा सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या वारसदारांमध्ये सहभागी आहेत.

मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी रिलायन्सचा अक्षय ऊर्जा, हरित ऊर्जा सारख्या कामांची जबाबदारी सांभाळत आहेत. रिलायन्स आगामी काळात रिन्युएबल एनर्जी आणि ग्रीन एनर्जीवर लक्ष केंद्रित करत आहेत. एका अहवालानुसार संपत्ती निर्माण करण्यात अनंत अंबानी हे सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us