AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Juvekar : घरच्यांच्या आग्रहाखातर मी आज लग्न करतोय…41 व्या वर्षी संतोष जुवेकर चढला बोहल्यावर? व्हिडिओनं वेधलं लक्ष

Santosh Juvekar Post : मराठी अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अशातच आता अभिनेत्यानं सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे.

Santosh Juvekar : घरच्यांच्या आग्रहाखातर मी आज लग्न करतोय...41 व्या वर्षी संतोष जुवेकर चढला बोहल्यावर? व्हिडिओनं वेधलं लक्ष
| Updated on: Nov 24, 2026 | 1:59 PM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांना विशेष उत्सुकता असते. संतोषचं वय आता 41 असून तो लग्न कधी करणार, असा प्रश्न त्याला अनेकदा विचारला जातो. अशातच अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात तो थेट ‘मी आज लग्न करतोय’ असं म्हणताना दिसतोय. त्यामुळे चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे.

संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत

संतोष जुवेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यानं ‘एकदाचं लग्न लागलं ओ’ असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तो म्हणतो, ‘तुम्ही मला नेहमी विचारता ना, की लग्न कधी करणार? कधी करणार? आज तुमच्या विनंतीला मान देऊन आणि घरच्यांच्या आग्रहाखातर मी आज लग्न करतोय.’

मात्र, संतोषच्या या वक्तव्यामागे एक वेगळीच गंमत आहे. अभिनेता स्वतःच्या लग्नाबद्दल बोलत नसून, तुळशी विवाहाबद्दल सांगत असतो. व्हिडिओमध्ये त्याच्या घरात तुळशी विवाहाची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं. यावेळी त्याची आईदेखील मंगलाष्टका म्हणताना दिसते. या व्हिडिओमध्ये संतोष श्रीकृष्णाची मूर्ती हातात धरून उभा असल्याचं दिसतं. त्यानंतर श्रीकृष्ण आणि तुळशीचा विवाह पार पडतो. लग्नविधी पूर्ण झाल्यानंतर संतोष मजेशीर अंदाजात, ‘झालं बाबा लग्न, श्रीकृष्णाचं तुळशीशी… या दर्शन घ्या,’ असं म्हणतो.

एवढंच नाही तर व्हिडिओच्या शेवटी संतोष ‘नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली’ या गाण्यावर ठेका धरताना दिसतो. त्याचा हा मिश्किल अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. संतोषच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी त्याला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी त्याच्या विनोदी अंदाजाचं कौतुक केलं.

दरम्यान, संतोष जुवेकरच्या कामाबद्दल बोलायचं तर त्यानं ‘झेंडा‘, ‘मोरया‘, ‘फक्त लढ म्हणा‘, ‘छावा‘ यांसारख्या हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेता शेवटचा ‘मामाच्या गोव्याला जाऊया‘ या सिनेमात दिसला होता.

Follow Us
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक....
Pratap Sarnaik : रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक; प्रताप सरनाईकांचं बंद मागे घेण्याचं आवाहन
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर.
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर निशाणा!
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?
एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर..
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?