AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शंभराव्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड

मोठी बातमी समोर येत आहे,  शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. आज साहित्य महामंडळाची पुण्यात बैठक पार पडली, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

शंभराव्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड
Sharankumar LimbaleImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 1:55 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे,  शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. आज साहित्य महामंडळाची पुण्यात बैठक पार पडली, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात याबाबत आता पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून शरणकुमार लिंबाळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज पुण्यामध्ये साहित्य महामंडळाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे.    शरणकुमार लिंबाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केले आहे. हे चार दिवशीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2027 या काळात पार पडण्याची शक्यता आहे. हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जाते. पुणे विद्यापीठात प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

कोण आहेत शरणकुमार लिंबाळे?   

शरणकुमार लिंबाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केले आहे. ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून शरणकुमार लिंबाळे यांची ओळख आहे. ते दलित साहित्याच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक आहेत.  ‘अक्करमाशी’ या आत्मकथेमुळे साहित्यविश्वात विशेष प्रसिद्धी. सामाजिक विषमता, जातिव्यवस्था आणि वंचितांचे प्रश्न त्यांनी सातत्याने आपल्या लेखनातून मांडले आहेत. शरणकुमार लिंबाळे यांच्या  साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. हे साहित्य संमेलन दिनांक 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2027 या काळात पार पडण्याची शक्यता आहे.

Follow Us
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक....
Pratap Sarnaik : रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक; प्रताप सरनाईकांचं बंद मागे घेण्याचं आवाहन
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर.
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर निशाणा!
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?
एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर..
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?