AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : काव्या मारनच्या रिसेप्शनसाठी कर्मचाऱ्यांना खास आमंत्रण; कर्मचारी खुश, महागड्या गिफ्टची सोशल मीडियावर चर्चा

काव्या मारन हिने रिप्सेप्शन पार्टीचे आमंत्रण देताना कर्मचाऱ्यांना असे काही गिप्ट दिले आहे, की कर्मचाऱ्यांना प्रचंड आनंद झाला.आनंदाच्या भरात त्यांनी या आमंत्रण पत्रिकेचा आता व्हिडिओ शेअर केला आहे.

Video :  काव्या मारनच्या रिसेप्शनसाठी कर्मचाऱ्यांना खास आमंत्रण; कर्मचारी खुश, महागड्या गिफ्टची सोशल मीडियावर चर्चा
KAVMYA MARAN RCEPETION PARTY INVITATIONImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 2:03 PM
Share

ऑफिसमध्ये साधं सणासुदीला मिठाईचा डब्बा मिळाला तरी अनेक कर्मचाऱ्यांना आनंद होतो. पण इथे बॉसकडून रिप्सेप्शन पार्टी देताना चक्क सोन्याची अंगठी भेट म्हणून मिळाली आहे. सन ग्रुपमधील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या खास गिफ्ट बॉक्सचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सनरायझर्स हैद्राबाद सीईओ काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरूद्ध रविचंदर यांच्या लग्नाच्या निमित्ताने त्यांनी रिप्सेप्शन पार्टी आयोजित केली आहे. त्या रिप्सेप्शन पार्टीतं त्यांनी कर्मचाऱ्यांना देखील आमंत्रित केले आहे. पण या आमंत्रण कार्डसोबत त्यांनी असं काही दिलंय की कर्मचारी भलतेच खूश झाले आहेत.

गिफ्ट बॉक्स उघडताच कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये सन ग्रुपमधील कर्मचारीला रिप्सेप्शन पार्टी आमंत्रण बॉक्स खोलताना दिसत आहेत. या बॉक्समध्ये रिप्सेप्शन पार्टीचे आमंत्रण कार्ड चॉकलेट्स आणि सोन्याच्या अंगठ्या असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. या महिला कर्मचाऱ्याने बॉक्स उघडताच आत सोन्याची अंगठी पाहिली तिने लगेच ती बोटात घातली देखील तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. दुसऱ्या एका कर्मचाऱ्यानेही हा गिफ्ट बॉक्स उघडतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये हा त्यांच्या घरातील लग्नाचा सोहळा असा उल्लेख केला आहे. या व्हिडिओमुळे काव्या मारन हिने कर्मचाऱ्यांना नक्की असे काय दिले आहे याबद्दल लोकांना उत्सुकता होती.

25 नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांसाठी खास स्वागत समारंभ

काव्या मारन या सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांच्या कन्या आहेत. त्या सनरायझर्स हैद्राबादच्या साईओ म्हणूनही काम पाहतात. काव्या आणि अनिरूद्ध रविचंदर यांनी 11 नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये विवाह केला. त्यानंतर 21 आणि 22 नोव्हेंबरला चेन्नईमध्ये स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. आता 25 नोव्हेंबर रोजी सन ग्रुपच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वागत समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांना सोन्याच्या अंगठ्या दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असले, तरी या भेटवस्तूंबाबत सन ग्रुपकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या भेटींवरूनच सध्या चर्चा सुरू आहे.

Follow Us
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक....
Pratap Sarnaik : रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक; प्रताप सरनाईकांचं बंद मागे घेण्याचं आवाहन
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर.
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर निशाणा!
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?
एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर..
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका