AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: 8 कोटी कर्मचार्‍यांसाठी वर्षाअखेर आनंदवार्ता; आता UPI च्या माध्यमातून मिनिटात PF काढता येणार, अपडेट काय?

EPFO PF UPI Service: देशातील 8 कोटींहून अधिक नोकरदारांसाठी मोठी आनंदवार्ता धडकली आहे. आता त्यांना पीएफचे पैसे सहज युपीआय सुविधेच्या माध्यमातून काढता येतील. ही सुविधा या वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.

EPFO: 8 कोटी कर्मचार्‍यांसाठी वर्षाअखेर आनंदवार्ता; आता UPI च्या माध्यमातून मिनिटात PF काढता येणार, अपडेट काय?
8 कोटी कर्मचार्‍यांसाठी आनंदवार्ता; UPI च्या माध्यमातून मिनिटात PF काढता येणार
| Updated on: Nov 24, 2026 | 11:22 AM
Share

EPFO PF UPI Service: देशातील 8 कोटींहून अधिक नोकरदारांसाठी आनंदवार्ता आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने-ईपीएफओची खास सुविधा लवकरच सुरू होत आहे. UPI च्या माध्यमातून PF ची रक्कम काढता येणार आहे. ही सुविधा या डिसेंबर 2026 च्या अखेरीस सुरू होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. EPFO 3.0 मधील बदलाचा हा भाग आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ही सुविधा सुरू होणार होती. पण तांत्रिक अडचणी आणि चाचणी प्रक्रियेत मोठा वेळ गेला. त्यामुळे ही सुविधा अद्याप सुरू झाली नाही. मात्र या वर्षाच्या अखेरपर्यंत या सुविधेला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

किती पैसे काढता येतील?

आतापर्यंत पीएफचे पैसे काढण्यासाठी ईपीएफओच्या पोर्टलवर जाऊन क्लेम करावा लागत होता. त्यानंतर खात्यात रक्कम जमा होईपर्यंत एक आठवडा तर कधी कधी 15 दिवस लागत होते. कागदपत्रांमध्ये एक छोटीशी चूक झाली तरी क्लेम नाकारल्या जात होता आणि ही प्रक्रिया पुन्हा करावी लागत होती. आता नवीन प्रक्रियेत ही सर्व प्रक्रिया कालबाह्य ठरली आहे. माहितीनुसार, ही सुविधा तुमचा UAN क्रमांक आणि UPI खात्याशी जोडलेली असेल. सुरुवातीला ही सुविधा BHIM प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध होणार आहे.

तुमच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. खात्यात किती रक्कम शिल्लकी ठेवावी लागेल आणि तुम्हाला किती रक्कम काढता येईल याची माहिती लागलीच कळेल. यापूर्वी पीएफमधून 25 टक्के आंशिक रक्कम काढता येत होती. खात्यात 75 टक्के रक्कम ठेवावी लागत होती. 19 नोव्हेंबरला ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक झाली. त्यानुसार, 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. यामुळे गरजेच्या वेळी कर्मचाऱ्याला पैसे काढता येतील. ईपीएफओने आता पीएफ काढण्याचे जुने 13 नियम रद्द केले आहे. आता तीन सोप्या श्रेणीत ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार, अत्यावशक गरजा जसे की लग्न, शिक्षण, आजार यांचा एक गट, दुसऱ्या श्रेणीत घर खरेदी, बांधकाम, कर्ज परतफेड यांचा समावेश आहे. तिसऱ्या श्रेणीत नोकरी जाणे, कारखाना बंद होणे, नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश आहे. ही सुविधा वापरण्यासाठी कर्मचाऱ्यांचा UAN हा क्रमांक सक्रिय असणे आवश्यक आहे.

CITES 2.01 चा वापर

EPFO ने डिजिटल प्लॅटफॉर्म अत्याधुनिक करण्यासाठी CITES 2.01 (Centralised IT Enabled Services) अशी नवीन सुविधा सुरू केली आहे. EPFO नुसार पीएफचा पैसा UPI ॲपच्या माध्यमातून प्राप्त करता येईल. ईपीएफओ लवकरच UPI विड्रॉल मॉड्यूल ॲक्टिव्ह होईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना EPFO पोर्टलवर जावे लागेल. पुढे या सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी बँक खात्यातशी संबंधित यूपीआय (UPI) ॲक्टिव्ह करावे लागले. त्यानंतर PF चै पैसा थेट UPI च्या माध्यमातून थेट बँक खात्यात हस्तांतरीत करता येतील.

Follow Us
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन