AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी आनंदवार्ता! PF थेट UPI ने काढा, लवकरच सुविधा, कामगार मंत्रालयाने तारीखच सांगितली

UPI PF Withdrawal: आता पीएफ खात्यातील पैसा काढण्यासाठी लांबलचक प्रक्रिया आणि मोठ्या प्रतिक्षेची गरज नाही. पीएफचा पैसा UPI ॲपच्या माध्यमातून झटपट काढता येईल. ही रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरीत होईल. कामगार मंत्रालयाने याविषयीची अपडेट दिली आहे.

मोठी आनंदवार्ता! PF थेट UPI ने काढा, लवकरच सुविधा, कामगार मंत्रालयाने तारीखच सांगितली
मोठी आनंदवार्ता! PF थेट UPI ने काढा
| Updated on: Aug 08, 2026 | 11:42 AM
Share

मोठ्या प्रतिक्षेनंतर देशभरातील कोट्यवधी EPFO खातेदारांसाठी आनंदवार्ता धडकली आहे. आता प्रोव्हिडंट फंडातील (PF) पैसा काढण्यासाठी लोकांना किचकट प्रक्रिया आणि मोठी वाट पाहावी लागणार नाही. सध्या ऑनलाईन विनंती अर्ज केल्यावर दोन ते तीन दिवसात पीएफ रक्कम खात्यात जमा होते. पण येत्या काही दिवसात हा कालावधी एका दिवसावर येण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपासून EPFO सदस्य BHIM UPI ॲपच्या माध्यमातून थेट UPI-लिंक्ड बँक खात्यात पीएफची रक्कम प्राप्त करू शकतात. या नवीन सुविधेमुळे क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अधिक वेगवान, डिजिटल आणि पूर्वीपेक्षा अधिक सोपी -सुटसुटीत होईल.

पण हा नियमही जाणून घ्या

युपीआय ॲपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना केव्हापण आणि कोणत्याही कारणासाठी पीएफ काढू शकतील असे नाही. पीएफ काढण्यासाठीचे सर्व नियम त्यांना लागू असतील. म्हणजे जलद प्रक्रिया होईल. पेमेंट पद्धत बदलणार आहे. नियमात बदल होणार नाही. नवीन युपीआय पद्धतीमुळे पीएफ खात्यातून झटपट रक्कम काढता येईल. पण योग्य कारण आणि नियमानुसारच कर्मचाऱ्यांना पैसे काढता येतील. त्यांना वारंवार या सुविधेचा वापर करता येणार नाही.

1 महिन्यात UPI मधून PF चा पैसा काढण्याची सुविधा

कामगार मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनुसार ही सुविधा लवकरच म्हणजे एका महिन्याच्या आत सुरू होईल. त्याची चाचणी पूर्ण झाली आहे. तांत्रिक अडचणी सोडवल्या जात आहे. ही अडचण लवकरच सोडवल्यास या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अथवा सप्टेंबर महिन्यात युपीआय ॲपच्या माध्यमातून पीएफची रक्कम काढता येणार आहे. EPFO च्या सेवा अधिक आधुनिक करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना जलद पैसे मिळण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची मानली जात आहे.

EPFO शी UPI कसे होईल कनेक्ट?

EPFO ने डिजिटल प्लॅटफॉर्म अत्याधुनिक करण्यासाठी CITES 2.01 (Centralised IT Enabled Services) अशी नवीन सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा अपग्रेड करण्यात येत आहे. पीएफशी संबंधित सेवा अजून गतिमान करणे, ही सुविधी सुटसुटीत आणि सोपी करणे, डिजिटल करणे हा त्याचा उद्देश आहे

EPFO नुसार पीएफचा पैसा UPI ॲपच्या माध्यमातून प्राप्त करण्यासाठी फार वाट पाहावी लागणार नाही. ईपीएफओ लवकरच UPI विड्रॉल मॉड्यूल ॲक्टिव्ह होईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना EPFO पोर्टलवर जावे लागेल. पुढे या सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी बँक खात्यातशी संबंधित यूपीआय (UPI) ॲक्टिव्ह करावे लागले. त्यानंतर PF चै पैसा थेट UPI च्या माध्यमातून थेट बँक खात्यात हस्तांतरीत करता येईल. पैसे हस्तांतरीत केल्यानंतर तुम्हाला ते एटीएमवरून काढता येतील अथवा संबंधित ठिकाणी पाठवता येतील.

Follow Us
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय