AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: दिल्लीत कर्मचार्‍यांसोबत मॅरेथॉन बैठक, फिटमेंट फॅक्टर वाढणार? 8 व्या वेतन आयोगाची अपडेट काय?

8th Pay Commission Latest News: 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी कधी येणार याविषयी मोठा खुलासा समोर आला आहे. दिल्लीत सध्या कर्मचारी आणि पेन्शनर्स प्रतिनिधींसोबत वेतन आयोगाच्या सदस्यांची बैठक सुरू आहे. काय आहे अपडेट?

8th Pay Commission: दिल्लीत कर्मचार्‍यांसोबत मॅरेथॉन बैठक, फिटमेंट फॅक्टर वाढणार? 8 व्या वेतन आयोगाची अपडेट काय?
कर्मचार्‍यांबाबत मॅरेथॉन बैठक, फिटमेंट फॅक्टर वाढणार?
| Updated on: Aug 08, 2026 | 9:43 AM
Share

8th pay commission: केंद्र सरकारने लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी एक मोठी अपडेट दिली आहे. दिल्लीत 8 व्या वेतन आयोगाचे सदस्य विविध सरकारी संघटना आणि निवृत्तीधारकांच्या संघटनासोबत चर्चा करत आहेत. ही बैठक कालपासून सुरू झाली असून येत्या 10 ऑगस्टपर्यंत चर्चेसोबतच सूचना, हरकती स्वीकारल्या जातील. कर्मचारी संघटना, पेन्शनर्स आणि त्यांच्या प्रतिनिधींनी त्यासाठी सूचना केल्या आहेत. तर मे 2027 पर्यंत नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी येण्याची शक्यता आहे. यामध्ये वेतन वाढ, पेन्शन वाढीसह इतर शिफारशी करण्यात येतील. त्यानंतर केंद्र सरकार पुढील निर्णय घेईल.

फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा मुद्दा

8 व्या वेतन आयोगाला कर्मचारी संघटनांनी त्यांच्या हरकती, सूचना नोंदवल्या. त्यांनी निवेदन सादर केले. कर्मचारी संघटना मूळ पगार, पेन्शन, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता, इतर अनुषांगिक लाभ, सेवा शर्ती आणि इतर विषयावर चर्चा करतील. विविध संघटनांची बाजू ऐकल्यानंतर येत्या दहा महिन्यात आयोग शिफारस अहवाल सादर करेल. याविषयीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करेल. यापूर्वीच सरकारने आयोगाच्या कामकाजात कुठलाही हस्तक्षेप करत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

फिटमेंट फॅक्टर कळीचा मुद्दा

फिटमेंट फॅक्टर हा कळीचा मुद्दा ठरला आहे. सरकारी कर्मचारी त्यासाठी आग्रही आहेत. देशातील विविध कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची मागणी लावून धरली आहे. 7 व्या वेतन आयोगातंर्गत 2.57 हा फिटमेंट फॅक्टर होता. महागाई आणि आर्थिक परिस्थिती पाहता वेतन आयोगात 2.15 असे गुणोत्तर फिटमेंट फॅक्टर ठरवू शकते. पण कर्मचारी संघटना यांची आग्रही भूमिका पाहता फिटमेंट फॅक्टर अधिक असण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर आधारेच मूळ वेतन निश्चित करण्यात येते. अजून शिफारशी यायच्या आहेत. शिफारशींना मंजूरी मिळाल्यानंतर सरकारची फिटमेंट फॅक्टरविषयीची भूमिका स्पष्ट होईल. त्याआधारेच पगार वाढ, पेन्शन वृद्धी आणि महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

पगार वाढणार का?

दिल्लीतील सध्या सुरू असलेली मॅरेथॉन बैठक ही प्रक्रियेचा भाग आहे. पण अद्याप नवीन पगार बँड, फिटमेंट फॅक्टर, पेन्शन, अनुषांगिक भत्ते याविषयीची मोठी अपडेट समोर आलेली नाही. आयोग सध्या प्रत्येक राज्यात जाऊन प्रतिनिधी, संघटनांकडून त्यांच्या सूचना मागवत आहे. हरकती नोंदवत आहे. त्यानंतर याविषयीच्या शिफारसी सरकारसमोर सादर करेल.

केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना वाढत्या महागाईत अजून एक आनंदवार्ता दिली आहे. कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यात (DA) वाढीचा फायदा मिळू शकतो. ताज्या आकडेवारीनुसार, जुलै 2026 पासून DA मध्ये 3% टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. य़ा घडामोडींमुळे कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Follow Us
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकरी संकटात
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस