AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता? 12 रुपयाचं प्युअर सोनं, 15 रुपयाची चांदी… ग्राहकांच्या उड्या, आपल्याच देशात मोठी खरेदी

सोनं आणि चांदी 12-15 रुपयाला मिळत असल्याचा भ्रम ईटीएफमुळे निर्माण झाला आहे, पण हे प्रत्यक्षात धातूचे छोटे युनिट्स असतात. यामुळे लहान गुंतवणूकदारांना कमी पैशात शुद्ध सोनं-चांदी खरेदी करता येते. मेकिंग चार्ज, शुद्धतेची चिंता आणि लॉकरचा खर्च वाचतो, तसेच डिमॅटमध्ये सुरक्षित गुंतवणूक होते. म्हणूनच गोल्ड-सिल्व्हर ईटीएफची लोकप्रियता वाढत आहे.

काय सांगता? 12 रुपयाचं प्युअर सोनं, 15 रुपयाची चांदी... ग्राहकांच्या उड्या, आपल्याच देशात मोठी खरेदी
Gold and Silver ETF InvestmentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 6:20 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे ग्राहक सोनं चांदी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. कारण 12 रुपयात प्युअर सोनं आणि 15 रुपयात चांदी मिळत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून सोन्या चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे खरेदीदारीच्या पॅटर्नमध्ये झालेला बदल. सोने-चांदी खरेदी करण्याचे दोन मुख्य पर्याय आहेत. एक फिजिकल आणि दुसरा डिजिटल.

डिजिटल खरेदीमध्ये मोठा बदल झाल्याने छोट्या छोट्या गुंतवणूकदारांना सोन्या चांदीत गुंतवणूक करण्यास आकर्षित करण्यात आलं आहे. गोल्ड-सिल्वहरचे ईटीएफ मार्केट आल्यापासून हे आकर्षण अधिक वाढलं आहे. भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांचा कल गोल्ड आणि सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF)कडे अधिक वाढला आहे. गेल्या वर्षभरात या फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक झाल्याचं आकडेवारी सांगते.

बाजारात यावेळी टाटा गोल्ड ETF जवळपास 12 रुपयात, Groww Gold ETF 12 रुपयात, Angel One Gold ETF 12 रुपयात आणि DSP Gold ETF सुमारे 12 रुपयात मिळत आहे. मार्केटमध्ये सोन्याचा भाव सध्या 1.25 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. एक ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी सुमारे 13 हजार रुपयांची आवश्यकता आहे. तर ईटीएफच्या माध्यमातून गुंतवणूकदार केवळ 12 रुपयात सोनं खरेदी करत आहेत. त्यामुळेच 12 ते 15 रुपयाला सोनं चांदी विकली जात असेल तर गुंतवणूकदार आकर्षित होणं स्वाभाविक आहे.

तर, सध्या चांदी 1.50 लाख रुपये प्रति किलो आहे. ईटीएफच्या माध्यमातून 15 रुपयात चांदी मिळत आहे. टाटा सिल्व्हर ETF, Groww सिल्व्हर ETF आणि कोटक सिल्व्हर ETF, DSP Silver ETF, Quant Silver EFT सुमारे 15 रुपये प्रति यूनिटच्या हिशोबाने उपलब्ध आहे. Angle One silver ETF चा एक यूनिट तर 5 रुपयाने मिळत आहे. त्यामुळेच 12 ते 15 रुपयाच्या स्वस्त यूनिटमध्ये चांदी आणि सोनं मिळत असल्याने ग्राहकांमध्ये मोठा उत्साह वाढला आहे हेच यामागचं कारण आहे का? असा सवाल केला जात आहे.

स्वस्त नाही, तर छोटी यूनिट

गुंतवणुकीच्या विश्वात नेहमी हा भ्रम असतो की, 12 रुपयाचा ETF, 100 रुपयाच्या ETF पेक्षा स्वस्त आहे. वास्तवात कोणत्याही ईटीएफची प्रति यूनिट किमत (NAV) यावर अवलंबून आहे की, फंड हाऊसमध्ये एक यूनिट सोने वा चांदीची किती मात्रा (जसं की, 0.01 ग्रॅम वा 0.1 ग्रॅम) ने जोडलं जातं. उदाहरण द्यायचे झाले तर सोन्याची किंमत 1,21,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर त्या 0.001 ग्रॅम सोन्याचं मूल्य सुमारे 12 रुपये होईल.

वास्तवात, फिजिकली सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर हजारो किंवा लाखो रुपयांची आवश्यकता असते. मात्र, 12-15 रुपये प्रति यूनिटमुळे विद्यार्थी, नोकरदार आणि नवीन गुंतवणूकदार आपल्या खिशाला परवडेल एवढ्या छोट्या रकमेत दर महिन्याला गुंतवणूक करत आहेत. सध्या क्रॅशमद्ये सोनं 1.21 लाख रुपये आणि चांदी 1.50 लाख रुपयांच्या आसपास आली, तेव्हा कमी किंमतीत अधिक यूनिट खरेदी करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळाली.

यामुळेही ईटीएफची लोकप्रियता वाढली

केवळ 12-15 रुपये किमतीनेच नव्हे तर अनेक अन्य ठोस कारणांनी गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफची लोकप्रियता वाढवली आहे. फिजिकल सोने-चांदी खरेदी केल्यावर मेकिंग चार्ज, शुद्धतेची चिंता आणि लॉकरमध्ये सोनं ठेवण्याचा खर्च येतो. याच्या उलट ईटीएफममध्ये 99.5% ते 99.9% टक्क्यापर्यंत शुद्ध धातू असतो. आणि ते थेट डिमॅट खात्यात सुरक्षित राहते. शेअर बाजाराच्या कामकाजाच्या वेळेत गुंतवणूकदार कधीही उपलब्ध बाजार भावात हे यूनिट्स खरेदी करू शकतात किंवा विकू शकतात. त्यामुळे त्यांना तात्काळ रोख रक्कम मिळते.

मात्र, ईटीएफ निवडताना केवळ 12 वा 15 रुपये किमत पाहून निर्णय घेऊ नये. तर फंडाचा एक्सचेंज रेशियो, ट्रॅकिंग एरर आणि बाजारातील त्याची लिक्विडीटी तपासली पाहिजे.

ईटीएफचा जलवा

सप्टेंबर 2026च्या अखेरीपर्यंत गोल्ड ईटीएफ एकूण AUM 1,86,310 करोड रुपयाच्या पुढे गेला आहे. तर सिल्व्हर ETF चा एकूण AUM 81,636 करोड रुपये स्तरावर गेला आहे. असोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार (नोव्हेंबर 2025 ते ऑक्टोबर 2026 पर्यंतचा 12 महिन्याचा अवधी) गेल्या एक वर्षात भारतीय गुंतवणूकदारांनी गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफमध्ये विक्रमी 88,505 करोड रुपयांची शुद्ध गुंतवणूक केली आहे. यात गोल्ड ETF मध्ये 64,788 कोटी रुपये आणि सिल्व्हर ETF मध्ये 23,717 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. केवळ जानेवारी 2026 मध्ये गोल्ड ETFमध्ये 24,040 कोटींची विक्रमी मासिक गुंतवणूक नोंदवली गेली आहे.

दुसरीकडे, जानेवारी ते ऑक्टोबर 2026च्या दरम्यान, सिल्व्हर ETF मध्ये 17,601 कोटींची शुद्ध गुंतवणूक झाली आहे. तर पूर्ण वर्षभरात 2025 मध्ये हा आकडा 23,472 कोटी रुपये होता. गुंतवणूकदार म्यूच्युअल फंडाऐवजी गोल्ड सिल्व्हर ETFला अधिक प्राधान्य देत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गोल्ड-सिल्व्हर ETF आणि फंड ऑफ फंड्स (FoF) म्यूच्युअल फंड दोन्हीही सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याचे उत्तम पर्याय आहेत. पण यात काम करण्याची पद्धत, खात्याची गरज आणि खर्च यात मोठं अंतर आहे.

सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे खर्चाच्या बाबतीत गोल्ड सिल्व्हर ETF नेहमीच स्वस्त पडतो. कारण FoF मध्ये अंडरलाइंग ETF च्या खर्चाच्या वर म्यूच्युअल फंडाचा अतिरिक्त खर्चही जोडला जातो. आकड्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसून येतेय की, सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण होत असताना गुंतवणूकदार घाबरून जाऊन पैसे काढण्याऐवजी घसरणीच्या काळात मोठी खरेदीदारी करण्यात व्यस्त आहेत.

Follow Us
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय