Mukesh Ambani : कोल्ड्रिंक्सनंतर रिलायन्सचा हा ब्रँड लवकरच बाजारात, थंड बाजारात भडकेल आग! मुकेश अंबानी पुरविणार जीभेचे चोचले

| Updated on: Apr 07, 2023 | 6:38 PM

Mukesh Ambani : कोल्ड्रिंक्सनंतर आता रिलायन्स या क्षेत्रात धुमाकूळ घालणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील ब्रँडेड कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. पण तुमच्या जीभेचे चोचले पुरविण्याचे काम मात्र रिलायन्स नक्की करणार आहे.

Mukesh Ambani : कोल्ड्रिंक्सनंतर रिलायन्सचा हा ब्रँड लवकरच बाजारात, थंड बाजारात भडकेल आग! मुकेश अंबानी पुरविणार जीभेचे चोचले
Follow us on

नवी दिल्ली : रिलायन्स समूह (Reliance Group) आता प्रत्येक क्षेत्रात त्याची अमिट छाप सोडण्याची योजना आखत आहे. तेल, गॅस, टेलिकॉम एवढ्या पुरतं मर्यादीत न राहता हा समूह आता अनेक क्षेत्रात हातपाय पसरवत आहे. सर्वात श्रीमंत आशियातील भारतीय मुकेश अंबानी (Mukesh Ambani) त्यासाठी सज्ज झाले आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या ताज्या यादीत त्यांनी टॉप-10 मध्ये क्रमांक पटकावला आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स समूहाने कॅम्पा कोला (Campa Cola) ब्रँड खरेदी करुन तो बाजारात उतरवला. या ब्रँडने बाजारात धुमाकूळ घातला. आता रिलायन्स खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरविणार आहे. खवय्यांचा हा आवडता खाद्यपदार्थ रिलायन्स विक्री करणार आहे. त्यामुळे थंड बाजारात आग भडकेल.

थंड बाजारात आग
टाईम्स ऑफ इंडियाने याविषयीची एक बातमी दिली आहे. कम्पा कोलाच्या यशानंतर रिलायन्स आता फुड मार्केटमध्ये अजून एक खेळी खेळणार आहे. आईसक्रीम सर्वांचाच वीक पॉईंट आहे. लहान मुलंच नाही तर मोठ्या व्यक्तींना ही आईसक्रीमची चटक आहे. अनेक जणांच्या डीप फ्रीजमध्ये आईसक्रीमचे बॉक्स असतात. हा बाजार फार मोठा आहे. भारतात या बाजाराची दररोज कोट्यवधींची उलाढाल होते.

इंडिपेंडेंस आईसक्रीम
रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स, ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची कंपनी आहे. तिची FMCG कंपनी इंडिपेंडेंस ब्रँड आईसक्रीम सेक्टरमध्ये आग लावणार आहे. आईसक्रीम सेक्टरमध्ये सध्या नावाजलेले ब्रँड आहेत. त्यांना रिलायन्सच्या इंडिपेंडेंस ब्रँडचे मोठे आव्हान असेल. गेल्यावर्षीच हा ब्रँड बाजारात आला. हा ब्रँड मसाले, खाद्यतेल, डाळी, अन्नधान्य आणि इतर पॅकबंद उद्योगात आहे. हे काम आऊटसोर्सिंगद्वारे करण्यात येईल. त्यासाठी गुजरातमधील एका कंपनीसोबत चर्चा सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

20000 कोटींचा बाजार
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भारतात आईसक्रीमचा बाजार फार मोठा आहे. जवळपास 20000 कोटी रुपयांचा हा बाजार आहे. ज्यामध्ये संघटित क्षेत्रातील हिस्सा जवळपास अर्धा आहे. सध्या अमूल, वाडीलाल, क्वालिटी वॉल्स यासारख्या कंपन्या मार्केटमधील लिडर आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवर ही अनेक कंपन्यांचे मजबूत नेटवर्क आहे.

गुजरातमधील कंपनीशी चर्चा
टाईम्स ऑफ इंडियाच्या मते, रिलायन्स आईसक्रीम बाजारात थेट पाऊल टाकणार नाही. त्यासाठी रिलायन्स एखादा ब्रँड खरेदी करण्याच्या तयारीत आहे. गुजरातमधील एका कंपनीसोबत याविषयी चर्चा सुरु आहे. मुकेश अंबानी या उन्हाळ्यात आईसक्रीम बाजारात आग लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. Jio Mart माध्यमातून आईसक्रीमची विक्री करण्यात येईल. या आईसक्रीमचे नाव काय असेल याविषयी अजून माहिती समोर आली नाही