Viral: फक्त झोपून मुंबईच्या तरुणीने जिंकले 9.6 लाख रुपये! ना जॉब , ना बिझनेस; 2,00,000 लोकांना हरवून जिंकली अनोखी स्पर्धा

विश्वास बसो वा नसो, पण मुंबईतील एका तरुणीने फक्त झोपून तब्बल 9.6 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. आजच्या काळात तुम्ही झोपेत असतानाही पैसे कमवू शकता हे तिने दाखवून दिले आहे.

Viral: फक्त झोपून मुंबईच्या तरुणीने जिंकले 9.6 लाख रुपये! ना जॉब , ना बिझनेस; 2,00,000 लोकांना हरवून जिंकली अनोखी स्पर्धा
mumbai girl won 9 lakhs by just sleeping
| Updated on: Nov 08, 2026 | 1:28 PM

मुंबईतील तरुणीसोबत एक अनोखी घटना घडली असून तिला चक्क काहीही न करता 9.6 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. या तरुणीने दाखवून दिले आहे की, जॉब न करता न बिझनेस न करता पैसे आजकालच्या काळात तुम्ही पैसे मिळू शकता. रात्रीची चांगली झोप केवळ आरोग्यासाठी फायदेशीरच असते असे नाही, तर ती उत्पन्नाचे साधनही ठरू शकते हे तिने दाखवून दिले. मुंबईतील झिनिया चॅटर्जी हिने झोपण्यासाठी ९.६ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. इतकेच नव्हे, तर तिला कंपनीकडून एका स्पॉन्सर हॉलिडेसुद्धा बक्षीस देखील मिळाले आहे. झिनियाला भारताची ‘स्लीप चॅम्पियन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या अनोख्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशभरातून २ लाखांहून अधिक लोकांनी अर्ज केले होते. पण या तरुणीने विशेष उल्लेखनीय कामगिरी करत विजय मिळवला आहे.

2,00,000 लोकांचा सहभाग

झोपेच्या या अनोख्या स्पर्धेत तब्बल 2,00,000 हून अधिक लोकांनी अर्ज केले होते. मात्र, अनेक फेऱ्यांमधील छाननी आणि वैयक्तिक मुलाखतींनंतर, केवळ १० व्यक्तींची निवड करण्यात आली. या स्पर्धकांना सुमारे ६० दिवसांच्या कालावधीत झोपेच्या बाबतीत उच्च दर्जाची कामगिरी राखणे आवश्यक होते. या स्पर्धकांना त्यांना दररोज त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेनुसार गुण दिले जात होते. या गुणांच्या आधारे एक ‘लीडरबोर्ड’ तयार करण्यात आला होता. या बोर्डमधून समजत होते की, कोणाला सर्वोत्तम झोप मिळत आहे. मात्र, या इंटर्नशिपसाठी केवळ झोपणे पुरेसे नव्हते तर स्पर्धकांना त्यांची क्रिएटिव्हिटीही सिद्ध करायची होती.

Loading...

दर आठवड्याला रंजक चॅलेंजेस

संपूर्ण स्पर्धेदरम्यान, दर आठवड्याला काही रंजक चॅलेंजेस दिली जात होती. यापैकी एक चॅलेंजेस ‘स्लीप सिनेमा’ नावाचे होते. यामध्ये स्पर्धकांना प्रसिद्ध चित्रपटांमधील दृश्ये अशा प्रकारे पुन्हा साकारायची होती की, त्यात झोपेशी संबंधित विषयाचा समावेश होता जसा की चित्रपटातील एखादे दृश्य झोपेशी निगडित मजेशीर वळण देऊन पुन्हा मांडायचे होते. याव्यतिरिक्त, ‘स्लीप बिंगो’ नावाचे आणखी एक चॅलेंजेस होते, ज्यामध्ये स्पर्धकांना संपूर्ण आठवडाभर स्वतःच्या झोपण्याच्या सवयींवर लक्ष ठेवून त्यांचे मूल्यमापन करायचे होते.

सर्वात रंजक चॅलेज म्हणजे ‘अंडरकव्हर स्लीप मिशन’ . यामध्ये सहभागी स्पर्धकांना संभाषणादरम्यान ‘ब्लँकेट’ किंवा ‘पिलो’ हे शब्द १० वेळा वापरायचे होते. हे शब्द अशा प्रकारे की समोरच्या व्यक्तीला कोणताही संशय येऊ नये. हे काम ऐकायला सोपे वाटत असले, तरी संभाषणात नैसर्गिकपणा टिकवून ठेवत या शब्दांचा वापर करणे, हे एक अत्यंत मनोरंजक आव्हान ठरले. दर आठवड्याला, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्पर्धकाला ‘प्रो स्लीपर ऑफ द वीक’ हा किताब देऊन सन्मानित केले जात असे.

शेवटच्या रात्रीची झोप विजेत्याचा निर्णय ठरवणारी

जवळपास दोन महिने ही स्पर्धा सुरु होती. सगळी आव्हाने पूर्ण केल्यानंतर, सर्व अंतिम स्पर्धकांनी त्यांनी तयार केलेल्या झोपण्याच्या व्यवस्थेत शेवटची रात्र घालवली. त्यांच्या झोपेच्या गुणांच्या आधारे अंतिम निकालाची घोषणा करण्यात आली. झिनिया चॅटर्जीने इतरांपेक्षा सरस कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us