
अनेकदा पीएफ खातेधारकाने केवायसीची पूर्तता केलेली नसते. त्यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. याशिवाय, तुमचा केवायसी तपशील योग्य असणे गरजेचे आहे. तुम्ही EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन या गोष्टी योग्य आहेत किंवा नाही, हे तपासू शकता.

New income tax rule

जर तुम्ही हे केले नाही तर तुमच्या खात्यात नियोक्त्याकडून येणारे शेअर्स बंद होतील. म्हणजेच तुमच्या खात्यातील पैसे कमी होतील. जर तुम्हाला सतत खात्यात पैसे येत राहायचे असतील तर तुम्ही PF शी आधार लिंक करा.

PF Interest Rate

आधार कार्ड लिंक कसे करावे? आधार क्रमांक ईपीएफशी लिंक करण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ पोर्टल epfindia.gov.in वर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर 'ई-केवायसी पोर्टल' आणि 'लिंक यूएएन आधार' त्यानंतर 'ऑनलाईन सेवा' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा यूएएन नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर ओटीपी आणि तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. यानंतर तुमच्या आधार तपशीलांची पडताळणी करण्यासाठी तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या मेलच्या तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP जनरेट करा.