Future Vehicle : 100 रुपये नाहीतर अवघ्या 10 रुपयांत धावेल कार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या घोषणेने स्वप्न लवकरच सत्यात..

| Updated on: Dec 03, 2022 | 7:05 PM

Future Vehicle : काही दिवसात अवघ्या 10 रुपयांतच नाही तर त्यापेक्षाही कमी रुपयात तुमची चारचाकी-दुचाकी धावेल..

Future Vehicle : 100 रुपये नाहीतर अवघ्या 10 रुपयांत धावेल कार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या घोषणेने स्वप्न लवकरच सत्यात..
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) वाढत्या किंमतींनी तुम्हाला घाम फुटणार नाही आणि तुमची बाहेर जाऊन धमाल करण्याची योजनाही बारगळणार नाही. तुम्हाला पेट्रोल-डिझेलसाठी 100 रुपये खर्च करावा लागणार नाही. तर अवघ्या 10 रुपयांतच नाही तर त्यापेक्षाही कमी रुपयात तुमची चारचाकी-दुचाकी (Car-Bike) धावेल.यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याविषयीची घोषणा केली आहे.

देशात इलेक्ट्रिक व्हेईकलची (Electric Vehicle) खरेदी काही दिवसांपासून वाढली आहे. पण त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. ईव्हीच्या (EV) आवक्या बाहेरील किंमती ही त्यामागील खरं कारण आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल महाग असल्याने त्याच्या विक्रीवर परिणाम होत आहे.

इलेक्ट्रिक व्हेईकलच्या किंमतींविषयी लवकरच मोठा बदल होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक व्हेईकलच्या किंमती पेट्रोल-डिझेल वाहनांच्या बरोबरीला येतील, असा दावा गडकरी यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

गडकरी यांच्या दाव्यानुसार, 2024 पर्यंत इलेक्ट्रिक व्हेईकलच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. ईव्हीविषयीचे हे आश्वासन त्यांनी अनेक कार्यक्रमात बोलून दाखविले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे वाहनधारकांमध्ये मोठा उत्साह आला आहे.

इलेक्ट्रिक वाहन स्वस्तात उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकार मोठा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात इलेक्ट्रिक व्हेईकलच्या किंमती लवकरच कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासोबतच ग्रीन हायड्रोजन वाहनांचाही पर्याय समोर येणार आहे.

गडकरी यांच्या दाव्यानुसार, लिथियम आयन बॅटरीच्या किंमतीत मोठी घसरण सुरु आहे. झिंक आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरीचा प्रयोगही राबविण्यात येणार आहे. हायड्रोजन हा सर्वात स्वस्त इंधनाचा पर्याय असेल.

त्यामुळे पेट्रोल-डिझेलसाठी 100 रुपये खर्च करावा लागणार नाही. तर अवघ्या 10 रुपयांतच इलेक्ट्रिक वाहनाने तुमचा प्रवास होईल. हायड्रोजन वाहनांसाठी तर 1 रुपये प्रत‍ि क‍िमी खर्च येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.