Polymer Bank Notes: फाटक्या नोटांचं टेन्शन दूर, 10-20 रूपयांच्या पॉलिमर नोटा कधी बाजारात? RBI कडून मोठी अपडेट
Polymer Bank Notes: फाटक्या आणि मळक्या नोटांपासून तुमची लवकरच सुटका होणार आहे. लवकरच 10-20 रूपयांच्या पॉलिमर नोटा बाजारात येणार आहे. त्यासाठीची एक मोठी अपडेट समोर येत आहे.

RBI on Polymer Bank Notes: फाटक्या आणि मळक्या नोटांपासून तुमची लवकरच सुटका होणार आहे. अनेकदा 10 अथवा 20 रुपयांची फाटलेली नोट बाजारात मिळतेच. यामुळे सामान्य नागरिकांना मोठी अडचण येते. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 10 आणि 20 रुपयांच्या कागदी नोटांऐवजी प्लास्टिक, पॉलिमर नोटा घेऊन येत आहे. याविषयी RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याविषयीची माहिती दिली. कधी येणार या नोटा बाजारात,काय आहे मोठी अपडेट?
नवीन नोटांसाठी ATM मध्ये मोठा बदल
साधारणपणे जेव्हा नोटांचा आकार बदलतो, तेव्हा ATM मशीनमध्ये सुद्धा बदल करावा लागतो. त्यासाठी नोट ओळखणारा सेन्सर, कॅश कसेट आणि इतर तांत्रिक सेटिंग्समध्ये बदल करावा लागतो. त्यासाठी बँकांना अतिरिक्त खर्च येतो. तर RBI यंदा नवीन पॉलिमर नोटांचा आकार सध्याच्या 10 आणि 20 रुपयांच्या नोटांप्रमाणेच ठेवण्याची तयारी करत आहे. यामुळे नवीन नोटा ATM स्लॉट आणि कॅश कॅसेटमध्ये फिट होतील. अशा मशिनमध्ये मोठ्या बदलांची गरज नसेल. अर्थात काही तांत्रिक सेटिंग कराव्या लागतील.
किती नोटा छापणार RBI?
RBI ने या पायलट प्रकल्पासाठी एकूण 200 कोटी पॉलिमर नोटा छापण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये 10 आणि 20 रुपयांच्या नोटांची समान संख्या आहे. त्यानुसार, 10 रुपयांच्या 100 कोटी पॉलीमर नोटा तर 20 रुपयांच्या 100 कोटी पॉलिमर नोटांचा समावेश आहे.आरबीआयची उपकंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायतव्हेट लिमिटेडला (BRBNMPL) नोटा छापण्यासाठी आतापर्यंत 6 कंपन्यांकडून निविदा आल्या आहेत. पॉलिमर सायन्स कंपनी युफ्लेक्सने अमेरिकन कंपनी स्पेक्ट्रा सिस्टिमसह मोठी बोली लावली आहे.
केव्हा मिळतील नवीन पॉलिमर नोट?
सध्या RBI च्या नवीन योजनेनुसार, एप्रिल 2027 पासून 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटा बाजारात येण्याची शक्यता आहे. अर्थात या नोटा पायलट प्रकल्पानुसार बाजारात येतील. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात या नोटांचा बाजारात वापर होईल. काही निवडक ठिकाणीच या नोटा बाजारात येतील. त्यांची चाचणी आणि तपासणी करण्यात येईल. त्यावर जनतेच्या प्रतिक्रिया आणि वातावरणाचा या नोटांवरील परिणाम पाहिल्यानंतर पुढे मोठ्या प्रमाणात या नोटा बाजारात आणण्यात येतील.