No UPI Day: आज बाजारात जाताना खिशात कॅश ठेवा, व्यापाऱ्यांची ‘नो युपीआय डे’ ची घोषणा, UPI व्यवहार नाही चालणार

No UPI Day Today 2 October : युपीआय व्यवहारांवर MDR लागू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या पचनी पडला नाही. केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा होऊनही अनेक व्यापाऱ्यांनी आज 'नो युपीआय डे' ची घोषणा केली आहे. यामुळे बाजारात जाताना खिशात कॅश नक्की ठेवा.

No UPI Day: आज बाजारात जाताना खिशात कॅश ठेवा, व्यापाऱ्यांची नो युपीआय डे ची घोषणा, UPI व्यवहार नाही चालणार
व्यापाऱ्यांची 'नो युपीआय डे' ची घोषणा
| Updated on: Oct 02, 2026 | 9:06 AM

UPI व्यवहारांवर MDR लागू करण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही व्यापारी आंदोलनावर ठाम राहिले. आज व्यापाऱ्यांनी नो युपीआय डे जाहीर केला आहे. देशभरात आज शुक्रवारी, 2 ऑक्टोबर , गांधी जयंती दिनी रोखीनेच व्यवहार करणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. व्यवहारांवरील प्रस्तावित अतिरिक्त शुल्काला विरोध कायम असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. यूपीआय व्यवहारांवर व्यापारी शुल्क लागू करण्याच्या विरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी आज नो यूपीआय डे पुकारला आहे व्यापाऱ्यांनी युपीआय व्यवहार टाळून आंदोलनात सहभागी व्हावी असे आवाहन पुणे व्यापारी महासंघ आणि द पुना मर्चंट चेंबर या संस्थांनी केलं आहे.

व्यापाऱ्यांचा अतिरिक्त शुल्काला विरोध कायम

Loading...

UPI व्यवहारावर केंद्र सरकारने 0.4% मर्चेंट डिस्काउंट रेट (MDR) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देशातील 96 टक्के छोट्या व्यापाऱ्यांना लागू नसेल असे सरकारने स्पष्ट केले असले तरी विरोध कायम आहे. पेट्रोल, डिझेल, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि अन्नधान्यसारख्या वस्तू, उत्पादनावर नफा कमी झालेला आहे. GST चा मोठा भार व्यापारी सहन करत आहेत. आता पुन्हा युपीआय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क द्यावे लागले तर व्यवसाय करायचा कशाला? असा संतप्त सवाल व्यापारी करत आहेत. ही रक्कम जरी छोटी वाटत असली तरी मोठ्या व्यवहारांवर व्यापाऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसेल. जर 15 ऑक्टोबरपूर्वी एमडीआरचा निर्णय मागे घेतला नाही तर ते UPI QR कोड मशीनच नदीत फेकू असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

मध्यप्रदेशमध्ये मोठे आंदोलन

गेल्या महिन्यात 23 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदुर, जबलपूर आणि ग्वालियर सारख्या शहरात जवळपास 125 व्यापारी संघटनांनी अगोदरच ‘नो UPI डे’ आंदोलन केले आहे. जर सरकारने निर्णय न मागे घेतल्यास उग्र आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला आहे. व्यापाऱ्यांच्या दाव्यानुसार, महागाई, शुल्कामुळे जवळपास 25% व्यापार प्रभावित झाला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (MACCIA) आणि पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने सुद्धा या एक दिवसाच्या युपीआय बंदला पाठिंबा दिला आहे.

युपीआयला विरोध नाही

युपीआय अथवा डिजिटल व्यवहारांना व्यापाऱ्यांचा विरोध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.युपीआय स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये, अशी त्यांची ठाम भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी, आज या आंदोलनातील व्यापारी युपीआयद्वारे कोणताही व्यवहार करणार नाहीत. काही व्यापाऱ्यांनी काळे कपडे घालून निषेध करणार असल्याचा दावा केला आहे. दुकाने आणि व्यवसाय सुरू ठेवून शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निश्चिय त्यांनी बोलून दाखवला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us