AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bribe Case: शौचालय बिल मंजूरीसाठी 3.50 लाखांची लाच? गोवंडीतील धक्कादायक प्रकार, महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा

Public Toilet bill Bribe Case: पिंक आर्मी योजना आणि सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचे बिल मंजूर करण्यासाठी 3.50 लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोवंडीतील या धक्कादायक प्रकारामुळे महापालिकेची अब्रु वेशीवर टांगल्या गेली आहे.

Bribe Case: शौचालय बिल मंजूरीसाठी 3.50 लाखांची लाच? गोवंडीतील धक्कादायक प्रकार, महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा
शौचालय बिल मंजूरीसाठी 3.50 लाखांची लाच?
| Updated on: Oct 02, 2026 | 8:27 AM
Share

Govandi Toilet Bill Bribe Case : गोवंडी येथील पिंक आर्मी योजना आणि सार्वजनिक शौचालयाच्या सफाईचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी 3.50 लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 30 सप्टेंबर रोजी याप्रकरणी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे महापालिकेची अब्रु वेशीवर टांगल्या गेली आहे.

अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहायक अभियंता गणेश हनमंतराव चांदोलकर, उपअभियंता अविनाश दत्तात्रय दुधभाते आणि खासगी व्यक्ती विनीत खाडे या तिघांविरोधात या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35(3) अन्वये या अधिकाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

ACB च्या माहितीनुसार, 34 वर्षीय तक्रारदाराने गोवंडी येथील एम-पूर्व विभागात पिंक आर्मी योजनेतंर्गत सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छेतेचे कंत्राट घेतले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे रीतसर विनंती केली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे 3 लाख 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 5 मे 2026 रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.

प्रकरणात सापळा रचून कारवाई झालेली नाही. एसबीने 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12.15 वाजता गुन्हा नोंदवला. बीएनएसएस कलम 35(3) अन्वये या अधिकाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. प्रकरणात आरोपींची अंगझडती, वाहन आणि कार्यालयाची झडती, मोबाईल जप्ती, घरझडतीची कारवाई सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.

तपासात काय आढळले?

ACB कडे तक्रार आल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली. सहाय्यक अभियंता गणेश चांडोलकर यांनी स्वतःसाठी 2 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तर उर्वरित लाचेच्या रक्कमेबाबत उपअभियंता अविनाथ दुधमाते आणि खासगी व्यक्ती विनीत खाडे यांच्यात चर्चा झाल्याचे पुरावे एसीबीच्या तपासात समोर आले आहे. प्रकरणात पोलिसांनी 30 सप्टेंबर रोजी याप्रकरणी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेत या घटनेने खळबळ उडाली आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना