जगातलं सर्वात मोठं कॉर्पोरेट हनी ट्रॅप! CEOच्या अफेयरने Nvideaचा बाजार उठला, धक्कादायक रिपोर्ट समोर

प्रेमप्रकरणाने एनविडिया कंपनीच्या बाजारमुल्यामध्ये तब्बल 46 लाख कोटींची घट झाली आहे. एनविडियाचे सीईओ यांचे चिनी महिलोसोबतचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर कंपनीच्या बाजारमुल्यामध्ये प्रचंड मोठी घट झाली आहे.

जगातलं सर्वात मोठं कॉर्पोरेट हनी ट्रॅप! CEOच्या अफेयरने Nvideaचा बाजार उठला, धक्कादायक रिपोर्ट समोर
| Updated on: Nov 13, 2026 | 6:43 PM

Nvidia market value decreased:  एनव्हिडियाचे सर्वेसर्वा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआया विश्वाचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे सीईओ जेनसन हुआंग यांच्या प्रेमप्रकरणाने सध्या एआय विश्वात खळबळ उडाली आहे. जेनसन हुआंग यांचे चीनी महिला व्यावसायिक एलिस हुआंगसोब अफेयर सुरु असल्याचं उघड झाले. या चर्चानंतर हुआंग यांनी आपल्या सीईओपदाचा राजीनामाही दिला. मात्र या एका प्रेमप्रकरणाने एनविडिया कंपनीच्या बाजारमुल्यात मोठी घट झाली आहे तसेच अमेरिकन शेअर मार्केटमध्येही हाहाकार उडाला आहे.

प्रेमप्रकरणाने बाजार उठला, एनविडिया कंपनीला सर्वात मोठा धक्का

Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एनविडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांचे चिनी महिलेसोबत विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर कंपनीच्या बाजारमुल्यामध्ये प्रचंड मोठी घट झाली आहे. हे जगातलं सर्वात मोठे कॉर्पोरेट हनी टॅप असल्याचीही चर्चा आहे. या प्रेमप्रकरणाने एनविडिया कंपनीच्या बाजारमुल्यामध्ये तब्बल 46 लाख कोटींची घट झाली आहे. एनविडियाचे सीईओ यांचे चिनी महिलोसोबतचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर कंपनीच्या बाजारमुल्यामध्ये प्रचंड मोठी घट झाली आहे.

एलीस हुआंग नावाच्या चिनी महिलेसोबत जेन्सन हुआंग यांचे प्रेमसंबंध होते. एलिस हुआंग ही चिनची गुप्तहेर असून तिने एनविडियाच्या चीपची माहिती चीनला पुरवल्याचा संशय अमेरिकी सुरक्षा यंत्रणांना आहे. एलिस हुआंगसोबत असलेल्या विवाहबाह्य प्रेमप्रकरणाची जाहीर कबुली देत जेन्सन हुआंग यांनी एनविडियाच्या सीईओपदाचा राजीनामाही दिला आहे. या घडामोडींमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे.

शेअर्समध्ये 30 टक्क्यांची घट, कंपनीचे बाजारमुल्यही गडगडले! 

या सर्व प्रकरणानंतर एनविडियाच्या शेअर्समध्ये तब्बल 30 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या बाजारमुल्यामध्ये तब्बल 46 लाख कोटींनी कमी झाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. तसेच अमेरिकन सुरक्षा यंत्रणांकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे कंपनाीच्या गुंतवणुकदारांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us