AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: एका सामन्यात 5 मोठे विक्रम, पण भारतीय संघासाठी सर्वच नकोसे! न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात टीम इंडियाने काय गमावलं?

Team India 5 Major Records in New Zealand Win: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नकोशी नोंद झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या नावावर 5 लाजिरवाणे विक्रम झाले आहे.

IND vs NZ: एका सामन्यात 5 मोठे विक्रम, पण भारतीय संघासाठी सर्वच नकोसे! न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात टीम इंडियाने काय गमावलं?
IND vs NZ 5 Records That Shocked Cricket Fans
| Updated on: Nov 13, 2026 | 6:10 PM
Share

माउंट माउंगानुई येथील बे ओव्हलवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात किवी संघाने 244 धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. 334 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ अवघ्या 89 धावांवर गारद झाला. या एकतर्फी सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीच्या (6/27) भेदक गोलंदाजीने आणि भारतीय संघाच्या सुमार कामगिरीने पाच मोठे एकदिवसीय विक्रम प्रस्थापित झाले.

या सामन्यात भारतीय संघ 89 धावांवर सर्वबाद झाला, जी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील भारतीय संघाची सहावी सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताची सर्वात कमी एकदिवसीय धावसंख्या 54 धावा आहे, जी 2000 साली शारजा येथे श्रीलंकेविरुद्ध केली होती. यानंतर 1981 मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 63 धावा, 1986 मध्ये कानपूर येथे श्रीलंकेविरुद्ध 78 धावा, 1978 मध्ये सियालकोट येथे पाकिस्तानविरुद्ध 79 धावा आणि 2010 मध्ये दांबुला येथे न्यूझीलंडविरुद्ध 88 धावा केल्या गेल्या. 89 धावांची ही धावसंख्या सहाव्या स्थानावर आहे, तर यानंतर 2006 मध्ये डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 91 धावा आणि 2019 मध्ये हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध 92 धावांचा समावेश आहे.

भारतीय संघ आपल्या एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाच्या मानहानीकारक विक्रमाची बरोबरी करण्यापासून केवळ एका धावेने थोडक्यात बचावला. भारताचा सर्वात मोठा पराभव २४५ धावांनी झाला होता, जो 2000 साली शारजा येथे श्रीलंकेविरुद्ध झाला होता. आता न्यूझीलंडविरुद्धचा 244 धावांचा हा पराभव दुसऱ्या स्थानावर आला आहे. यापूर्वी भारताला 2015 मध्ये मुंबईतील वानखेडे येथे दक्षिण आफ्रिकेकडून 214 धावांनी, 2004 मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाकडून 208 धावांनी 1975 च्या विश्वचषकात लॉर्ड्स येथे इंग्लंडकडून 202 धावांनी आणि 2010 मध्ये दांबुला येथे न्यूझीलंडकडून 200 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

मॅट हेन्रीने घेतलेले 6 बळी हे भारताविरुद्धचे त्याचे चौथे एकदिवसीय यश होते. त्याने वेस्ट इंडिजचा रवी रामपॉल (14 डाव), श्रीलंकेचा अजंथा मेंडिस (19 डाव), ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली (30 डाव) आणि पाकिस्तानचा आकिब जावेद (36 डाव) यांच्या विक्रमांची बरोबरी केली आहे. त्यांनी प्रत्येकी चार वेळा भारताविरुद्ध हा पराक्रम केला आहे. हेन्रीने केवळ 12 डावांमध्ये हा पराक्रम करून या सर्व दिग्गजांना मागे टाकले आणि हा पराक्रम करणारा सर्वात वेगवान खेळाडू ठरला.

मॅट हेन्रीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील चौथी पाच बळींची कामगिरी पूर्ण करत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. यासह त्याने न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड (4 वेळा) यांच्या विक्रमाची बरोबरी केली आणि संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक पाच बळी घेण्याचा न्यूझीलंडचा विक्रम ट्रेंट बोल्टच्या (6 वेळा) नावावर आहे. त्यानंतर सर रिचर्ड हॅडली (5 वेळा) आणि पाचव्या स्थानावर टिम साउथी (3 वेळा) आहेत.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या फरकाने न्यूझीलंडचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. किवींच्या सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम 290 धावांचा आहे, जो त्यांनी 2008 मध्ये ॲबरडीन येथे आयर्लंडविरुद्ध नोंदवला होता. भारताविरुद्धचा हा 244 धावांचा विजय आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर 2004 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अमेरिकेविरुद्धचा 210 धावांचा विजय, चौथ्या क्रमांकावर 1986 मध्ये ॲडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा 206 धावांचा विजय आणि पाचव्या क्रमांकावर 2017 मध्ये क्राइस्टचर्च येथे वेस्ट इंडिजविरुद्धचा 204 धावांचा विजय आहे.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप