AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोयोटाची ही कार घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, 31 दिवसांमध्ये विकल्या 9441 कार

टोयोटाची ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची दिवाळीमध्ये झालेली प्रचंड गर्दी. कंपनीने 31 दिवसांमध्ये विकल्या तब्बल 9441 कार. कोणती आहे ती कार?

टोयोटाची ही कार घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, 31 दिवसांमध्ये विकल्या 9441 कार
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 13, 2026 | 6:01 PM
Share

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टोयोटाच्या कारना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर 2026 मधील कंपनीच्या मॉडेलनिहाय विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. या यादीत नेहमीप्रमाणे Toyota Innova आणि Innova Hycross यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. या दोन्ही मॉडेल्सच्या मिळून एकूण 9441 युनिट्सची विक्री झाली. मात्र, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत त्यांच्या विक्रीत 15 टक्क्यांची घट झाली आहे.

टोयोटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर Toyota Hyryder आहे. ऑक्टोबरमध्ये या SUV च्या 7797 युनिट्सची विक्री झाली. मात्र, वार्षिक तुलनेत विक्रीत 33 टक्क्यांची घट झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर Toyota Fortuner असून तिच्या 3976 युनिट्सची विक्री झाली. विशेष म्हणजे फॉर्च्युनरच्या विक्रीत वार्षिक आधारावर 36 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

चौथ्या क्रमांकावर Toyota Taisor असून तिच्या 3893 युनिट्सची विक्री झाली. या कारच्या विक्रीत 15 टक्क्यांची घट झाली आहे. पाचव्या क्रमांकावर Toyota Rumion असून तिच्या 2484 युनिट्सची विक्री झाली. रुमियनच्या विक्रीतही 9 टक्क्यांची घसरण झाली आहे.

ग्लान्झा आणि हिलक्सच्या विक्रीत घट

सहाव्या क्रमांकावर Toyota Glanza आहे. ऑक्टोबरमध्ये या कारच्या केवळ 842 युनिट्सची विक्री झाली असून वार्षिक आधारावर तब्बल 86 टक्क्यांची घट झाली आहे. सातव्या क्रमांकावर Toyota Hilux असून तिच्या 342 युनिट्सची विक्री झाली. आठव्या क्रमांकावर Toyota Camry असून तिच्या 202 युनिट्सची विक्री झाली. या दोन्ही मॉडेल्सच्या विक्रीत अनुक्रमे 9 आणि 27 टक्क्यांची घट झाली आहे.

महिन्याच्या तुलनेत विक्रीत 18 टक्क्यांची वाढ

वार्षिक विक्रीत अनेक मॉडेल्सची घसरण झाली असली, तरी सप्टेंबर 2026 च्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये टोयोटाच्या बहुतांश कारच्या विक्रीत सुधारणा झाली आहे. इनोव्हा आणि इनोव्हा हायक्रॉसच्या विक्रीत महिन्याच्या आधारावर 18 टक्क्यांची वाढ झाली. हायरायडरने 10 टक्के, फॉर्च्युनरने 25 टक्के आणि टायसरने 26 टक्क्यांची वाढ नोंदवली.

याशिवाय ग्लान्झाच्या विक्रीत तब्बल 346 टक्के, तर वेलफायरच्या विक्रीत 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूणच, सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर 2026 मध्ये टोयोटाच्या मासिक विक्रीत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे वार्षिक विक्रीतील घसरणीच्या पार्श्वभूमीवरही कंपनीने मासिक विक्रीत चांगली कामगिरी केली आहे.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप