एकमेव नोट ज्यावर आरबीआय गर्व्हनरची नसते सही, काय आहे कारण

एक रुपयांचा नोट प्रथम चलनात 30 नोव्हेंबर 1917 मध्ये आला. परंतु 1926 मध्ये त्याची छपाई बंद करण्यात आली. त्यानंतर 1940 मध्ये पुन्हा छपाई सुरु झाली. 1994 पर्यंत त्याची छपाई होत होती. परंतु त्यानंतर बंद झाली. 2015 मध्ये पुन्हा एका रुपयाच्या नोटेचे छपाई सुरु झाली. या नोटेचे छपाईचे काम अर्थ विभागाच्या अंतर्गत होते.

एकमेव नोट ज्यावर आरबीआय गर्व्हनरची नसते सही, काय आहे कारण
RBI
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 1:46 PM

तुमच्या आमच्या सर्वांच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग असणारे भारतीय चलन सर्वच जण वापरतात. भारतीय चलन म्हणजे रुपयांचा वापर आजच्या डिजिटल युगातही सर्वच जण करतात. देशात एक रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच्या नोटा आहेत. सध्या चलनात १ रुपये, २ रुपये, पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपयांच्या नोटा आहेत. या नोटांवर कोणाची सही असते? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (आरबीआय) असे देणार. परंतु तुमचे उत्तर चुकीचे असणार आहे. या सर्वच नोटांवर आरबीआय गव्हर्नरची सही नसते. त्यातील एक रुपयांची नोट वेगळी असते. त्यावर आरबीआय गव्हर्नर ऐवजी अर्थ विभागाच्या सचिवांची सही असते. त्याला विशेष कारण आहे.

नोटांची छपाई कुठे होते…

भारतात नोटांसंदर्भात 2016 मध्ये महत्वाचा निर्णय घेतला गेला. त्यावेळी ₹500 आणि ₹1,000 च्या नोटा बंद करण्यात आला. त्यावेळी ₹ 500 ची नवीन नोट आणि ₹ 2,000 ची नवीन नोट चलनात आली. तसेच ₹ 200 ची नोट आली. त्यानंतर मे 2023 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने ₹2,000 च्या नोटा चलनातून काढून घेण्यास सुरुवात झाली. ती सप्टेंबर 2023 पर्यंत कायदेशीर टेंडरमध्ये होती. या सर्व नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही होती. भारतात नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश) , म्हैसूर (कर्नाटक) आणि व सालबोनी (प. बंगाल) येथे या नोटांची छपाई केली जाते.

one rupees note

एक रुपयाच्या नोटवर का नसते गव्हर्नरची सही

भारतात एक रुपयांची नोट सोडून इतर सर्व नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणल्या जातात. परंतु एक रुपयांची एकमेव नोट अशी आहे जी रिझर्व्ह बँकेऐवजी भारत सरकार द्वारा चलनात आणली जाते. यामुळे त्या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऐवजी अर्थ सचिवांची सही असते. ही नोट छापताना गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या कागजाचा वापर केला जातो.

कधी आला एक रुपयांचा नोट

एक रुपयांचा नोट प्रथम चलनात 30 नोव्हेंबर 1917 मध्ये आला. परंतु 1926 मध्ये त्याची छपाई बंद करण्यात आली. त्यानंतर 1940 मध्ये पुन्हा छपाई सुरु झाली. 1994 पर्यंत त्याची छपाई होत होती. परंतु त्यानंतर बंद झाली. 2015 मध्ये पुन्हा एका रुपयाच्या नोटेचे छपाई सुरु झाली. या नोटेचे छपाईचे काम अर्थ विभागाच्या अंतर्गत होते.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.