AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील या बँकेवर आरबीआयचे निर्बंध, पैसेही काढता येणार नाही…काय असणार पर्याय

Shirpur Merchants Co-operative Bank: आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम किंवा नूतनीकरण करणार नाही. तसेच कोणीही गुंतवणूक करणार नाही.

महाराष्ट्रातील या बँकेवर आरबीआयचे निर्बंध, पैसेही काढता येणार नाही...काय असणार पर्याय
| Updated on: Apr 12, 2024 | 11:46 AM
Share

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसंदर्भात कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे या बँकेतून आता सहा महिने पैसे काढता येणार नाही. तसेच बँकेला कर्ज देण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे सहकारी बँकेमधील गुंतवणूकदारांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. कारण त्यांना त्यांच्या ठेवी किंवा बचत खात्यातील रक्कम काढता येणार नाही. राज्यातील शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेसंदर्भात ( Shirpur Merchants Co-operative Bank) हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेच्या खराब झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सहा महिन्यांसाठी निर्बंध

इकोनॉमिक्स टाईमन्स दिलेल्या वृत्तानुसार, आरबीआयकडून प्रथमच कोणत्या बँकेवर निर्बंध आणले गेले नाही. यापूर्वी यस बँक आणि पीएससी बँकेवर निर्बंध आणले होते. या बँकेतून पैसे काढण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेवर निर्बंध आणले आहे. आता कोणत्या ग्राहकांना सहा महिने बँकेतून पैसे काढता येणार नाही. परंतु बँकेत असणारी रक्कम सशर्त आपल्या कर्ज खात्यात भरता येणार आहे.

गुंतवणूकदारांपुढे काय पर्याय

आरबीआयने म्हटले आहे की, आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम किंवा नूतनीकरण करणार नाही. तसेच कोणीही गुंतवणूक करणार नाही. यामुळे शिरपूर मर्चेंट्स को-ऑपरेटिव बँकेच्या ग्राहकांपुढे आता काय पर्याय आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहकांना पाच लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.

कशी मिळणार रक्कम

कोणत्याही बँकेवर निर्बंध आणले गेले तर डिपॉजिट इंश्‍योरन्स आणि क्रेडिट गॅरंटी निगमच्या (DICGC) अधिनियमानुसार पाच लाखांपर्यंत रक्कम मिळते. बँकेच्या प्रत्येक गुंतवणूकदाराचा विमा असतो. त्या अंतर्गत मूळ रक्कम, व्याजाची रक्कमसुद्धा मिळते. हा विमा सर्व प्रकारच्या रक्कमेवर असतो. ही रक्कम 90 दिवसांच्या आत मिळते. आरबीआयने म्हटले आहे की, शिरपूर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना अधिक माहिती बँकेच्या वेबसाईटवरुन मिळू शकते.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.