Marathi News Business Pan Card is most needed here, otherwise you won't be able to do business without it, tie a knot with your mind
पॅन कार्ड नाही तर हे व्यवहार कसे करणार? तुमचं काम मध्येच अडकणार
Pan Card | केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅनकार्डविषयी काही मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. पॅन कार्ड आयकर विभागाकडून देण्यात येते. त्यात 10 अंकांचा अल्फान्युमेरिक युनिककोड असतो. त्यामुळे दोन करदात्यांचा पॅन कधी एकसारखा होत नाही. या ठिकाणी त्याचा वापर होतो.
नवी दिल्ली | 19 March 2024 : दररोजच्या जीवनात पॅनकार्डला अत्यंत महत्व आहे. हा एक महत्वाचा दस्तावेज आहे. अनेक व्यवहारासठी पॅनची गरज पडते. पॅनकार्ड अनिवार्य आहे. एका निश्चित मर्यादेनंतर व्यवहारासाठी पॅनकार्डची गरज पडते. तुमच्याकडून पॅनकार्ड क्रमांक अथवा त्याची फोटोकॉपी घेण्यात येते. मोठ्या रक्कमेसाठी तुम्ही पॅनकार्ड दिले नाही तर तुमचा व्यवहार थांबविल्या जाऊ शकतो. पॅनची पूर्तता झाल्याशिवाय पुढील प्रक्रिया पूर्ण होत नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडाळाने त्यासाठी निर्धारीत मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. पॅन कार्ड हे आयकर खाते नागरिकांना देते. यामध्ये 10 अंकांचा अल्फान्युमेरिक युनिककोड असतो. तुम्ही पॅनकार्डसाठी जेव्हा अर्ज करता, तेव्हा तुम्हाल एक विशिष्ट 10-अंकांची ओळख संख्या एका लिमिनेटेड प्लास्टिक कार्डवर अंकित करुन देण्यात येते. दोन करदात्यांचा पॅन कार्डवरील क्रमांक कधीच एकसारखा नसतो. अनेक कामासाठी पॅनकार्ड अत्यंत गरजेचे आहे. खासकरुन आर्थिक व्यवहारासाठी पॅनचा अधिक वापर होतो.
यासाठी पॅन कार्ड एकप्रकारे अनिवार्यच आहे
दुचाकी सोडून इतर वाहनांच्या विक्री वा खरेदीसाठी
एका निश्चित काळातील बँकेच्या बचतीवर, सहकारी खात्यातील मुदतीच्या बचतीसाठी