वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील प्रवाशांना मिळणार कमी जेवण! IRCTC ने का केली मेनूमध्ये कपात? जाणून घ्या

वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील प्रवाशांना मिळणाऱ्या जेवणाचे प्रमाण कमी करण्यात येणार आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) अशाप्रकारे मेनूमध्ये कपात का केली आहे याबद्दल जाणून घेऊयात.

वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील प्रवाशांना मिळणार कमी जेवण! IRCTC ने का केली मेनूमध्ये कपात? जाणून घ्या
vande bharat sleeper trains
| Updated on: Nov 26, 2026 | 8:01 AM

देशातील तीन वेगवेगळ्या मार्गांवर ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेन धावते. या स्लीपर ट्रेनमधील प्रवाशांना आता अन्नाचे कमी प्रमाण दिले जात आहे अर्थात जेवणाचा मेनू कमी करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या एका प्रायोगिक प्रकल्पाचा हा भाग असून, याद्वारे नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात दिल्या जाणाऱ्या पदार्थांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता प्रश्न पडतो असं का? तर,अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कधी पासून सुरु करण्यात आला मिनी मेनू?

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये १ नोव्हेंबरपासून ‘मिनी’ मेनू सुरू करण्यात आला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने अर्थात IRCTC ने १ नोव्हेंबरपासून हा मिनी मेनू लागू केला आहे. या मिनी मेनूमध्ये मिळणारे पदार्थ विमान प्रवासात दिल्या जाणाऱ्या जेवणासारखेच आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील अन्नाचा दर्जा आणि स्वच्छता यांबाबत प्रवाशांकडून वारंवार मिळणाऱ्या तक्रारींची दखल घेत हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Loading...

सगळ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये राबवली जाणार संकल्पना?

मिनी मेनूचा हा निर्णय रेल्वे मंत्रालयाने या वर्षाच्या सुरुवातीला विविध रेल्वे क्षेत्रांना दिलेल्या तोंडी निर्देशानंतर घेण्यात आला आहे, प्रवाशांकडून वारंवार मिळणाऱ्या तक्रारीमुळे हा निर्णय घेण्यात आला. रेल्वे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने ‘एचटी’ ला सांगितले की, ही संकल्पना सर्व वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये तपासली जात आहे. सध्या, वंदे भारत स्लीपर ट्रेन तीन मार्गांवर धावतात: मुंबई–बेंगळुरू, हावडा–कामाख्या आणि नवी दिल्ली–वाराणसी जंक्शन. या तिन्ही मार्गांवर सध्या लक्ष आहे.

मेनू लहान करून काय फायदा?

मेनू लहान असल्यास अन्नावर देखरेख ठेवणे अधिक सोपे होईल. या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, लहान मेनूमुळे अन्नावर लक्ष ठेवणे सुलभ होईल, ज्यामुळे संबंधित संस्थेला अन्नाची गुणवत्ता सुधारण्यावर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल. आयआरसीटीसी (IRCTC) सध्या प्रवाशांच्या रिव्हीव्यूकडे लक्ष देत आहेत. जर प्रतिसाद सकारात्मक मिळाला, तर हा उपक्रम इतर गाड्यांमध्येही लागू केला जाईल.

मेनूमधून काय काय कमी केले?

याव्यतिरिक्त, आयआरसीटीसीने (IRCTC) प्रवासादरम्यान प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांना मेनूमधून काढून टाकले आहे. यामध्ये सूप, ऑम्लेट, ऑम्लेट सँडविच, व्हेज सँडविच, ताक आणि चॉकलेट यांचा समावेश आहे. हे सर्व पदार्थ नाश्त्याच्या मेनूचा भाग होते. त्याचप्रमाणे, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मेनूमधून सुकी भाजी, दही, सॅलड, लोणचे आणि मिठाई काढून टाकण्यात आली आहेत. आयआरसीटीसीच्या माहितीनुसार, आता एका जेवणाचे वजन सुमारे ४५० ते ५०० ग्रॅम असेल, तर पूर्वी ते ७०० ते ७५० ग्रॅम इतके असायचे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us