
आज संपूर्ण जग प्लास्टीकमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांमुळे ग्रस्त झाले आहे. प्लास्टीक मायक्रो कण हवा, पाणी आणि अन्नातून आपल्या शरीरात जाऊन आपल्याला आजारी पाडत आहेत. जेव्हा कण मानवी शरीरात शिरकाव करतात खासकरुन फप्फुसात हे कण जातात तेव्हा सुज,जळजळ आणि पेशींची क्षती अशा समस्या निर्माण होतात. यामुळे Lung Inflammation आणि Airway Hyper-Responsiveness सारखे आजार होऊ शकतात असे म्हटले जात आहे.
आज आपले जग प्लास्टीकमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांनी ग्रस्त झाले आहे. हे प्लास्टीकचे छोटे-छोटे कण ज्यांना मायक्रो प्लास्टीक असे म्हटले जाते. ते आता हवा, पाणी आणि अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात शिरत आहेत. आपण जाणते अजाणतेपणी या प्लास्टीक कणांमुळे ग्रस्त आहोत. जेव्हा हे कण मानवी शरीरात प्रवेश करतात.
पतंजलीच्या संशोधकांनी उंदरांवर एक नवीन प्रयोग केला. या प्रयोगातून हे स्पष्ट झाले की मायक्रोप्लास्टिकमुळे फुप्फुसाच्या कार्यक्षमता कमी झाली असेल तर या आयुर्वेदिक औषध ब्रोंकोममुळे हे चांगल्या प्रकारे हे रोकता येऊन रुग्णाला नवे जीवन मिळते. ब्रोंकोममुळे मायक्रोप्लास्टीकमुळे होणारे फुप्फुसाच्या इन्फ्लेमेंशनसंबंधी मार्कर्स सारख्या Cytokine Release तसेच Airway Hyper-Responsiveness ला कमी करण्यास मदत होते. हे संशोधन जगप्रसिद्ध Elsevier प्रकाशनाच्या आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल Biomedicine & Pharmacotherapy मध्ये प्रकाशित झाले आहे.
या निमित्ताने आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीचा उद्देश्य आयुर्वेदला वैज्ञानिक रुपाने प्रमाणित करणे आणि जगाच्या आरोग्य संबंधी समस्यांचे निवारण करणे हा आहे. या संशोधनामुळे सनातन ज्ञान, पर्यावरणीय घटकांमुळे होणाऱ्या आजारांवर लक्ष्यित संशोधन आणि पुराव्यावर आधारित औषधोपचाराद्वारे देखील उपचार केले जाऊ शकतात हे सिद्ध झाले आहे.