Patanjali : पतंजली फूड्सचे शेअर्स 4 दिवसांपासून तेजीत, गुंतवणूकदारांनी कमावले 3900 कोटी रुपये

Patanjali Foods : पतंजली फूड्‍सचे शेअर्स सध्या तेजीत आहेत. 15 डिसेंबरपासून, कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांना 3900 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

Patanjali : पतंजली फूड्सचे शेअर्स 4 दिवसांपासून तेजीत, गुंतवणूकदारांनी कमावले 3900 कोटी रुपये
patanjali share market
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 23, 2025 | 4:10 PM

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. पतंजली फूड्‍सचे शेअर्स सध्या तेजीत आहेत. 15 डिसेंबरपासून, कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांना 3900 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. पंतजलीचे शेअर्स तेजीत असल्याने कंपनीचे मूल्यांकन 61 हजार कोटींच्या पुढे गेले आहे. शुक्रवारी पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये 2.75 % वाढ नोंदवण्यात आली होती. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पतंजलीचे शेअर्स तेजीत

गेल्या काही काळापासून पतंजलीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी दुपारी 12.50 वाजता, कंपनीचे शेअर्स 1..20% वाढून 558.30 वर व्यवहार करत आहेत. दिवस संपेपर्यंत कंपनीचे शेअर्स 2.75 टक्क्यांनी वाढून 566.85 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीपेक्षा 13 टक्क्यांहून अधिक वाढले. आज दिवसाच्या सुरुवातीला कंपनीचे शेअर्स 500 रुपयांजवळ पोहोचले होते. मात्र त्यानंतर शेअर्स मध्ये तेजी दिसून आली.

सलग चार दिवसांत किती वाढ झाली?

15 डिसेंबरपासून पतंजली कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत. बीएसईच्या आकडेवारीनुसार, 15 डिसेंबर रोजी कंपनीचे शेअर्स 531.20 रुपयांवर बंद झाले, जे 19 डिसेंबर रोजी वाढून 566.85 रुपयांपर्यंत वाढले. याचा अर्थ कंपनीच्या शेअर्समध्ये अंदाजे 7 टक्क्यांची वाढ झाली. एकाच महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 4 % पेक्षा जास्त घट झाली होती, मात्र गेल्या सहा महिन्यांत त्यात 2 % पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत, कंपनीने गुंतवणूकदारांना 61% परतावा दिला आहे.

3900 कोटींची कमाई

पतंजलीच्या शेअर्समध्ये सलग वाढ होत आहे. त्यामुळे कंपनीचे मुल्यांकनही वाढले आहे. 15 डिसेंबर रोजी कंपनीचे मूल्यांकन 57,785.44 कोटी रुपये होते, ते 19 डिसेंबर रोजीच्या व्यापार सत्रात 61663.54 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या काळात कंपनीचे मूल्यांकन किंवा गुंतवणूकदारांना 3878.1 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी असल्याने आगामी काळातही शेअर्सच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)