
पतंजली ही देशातील आरोग्य क्षेत्रातील वेगाने वाढणारी कंपनी आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, गेल्या काही काळात आयुर्वेद आणि योगाने लाखो लोकांचे जीवन सुधारले आहे. आता कंपनी रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली नवीन उंची गाठण्याच्या तयारीत आहे. 2025 पर्यंत, भारताला स्वावलंबी बनवणे आणि वेलनेस इंडस्ट्रीसाठी जागतिक स्तरावर मजबूत दावा करणे हे पतंजलीचे ध्येय आहे. या संदर्भात कंपनीकडून पावले उटलली जात आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
देशातील प्रत्येक घरात आयुर्वेदिक उत्पादने पोहोचणे, तसेच योग आणि प्राणायामचा प्रचार आणि प्रसार करून त्याला लोकांच्या जीवनाचा भाग बनवणे हे पतंजलीचे ध्येय आहे. कंपनीने म्हटले की, आमचटे ध्येय केवळ उत्पादने विकण्यापुरते मर्यादित नसून आरोग्य, शाश्वत शेती आणि डिजिटल नवोपक्रमांवर भर देणे हे देखील आहे. आमची पुढील योजना भारत आणि परदेशात 10 हजार कल्याण केंद्रे स्थापन करण्याचे आहे. या ठिकाणी योग सत्रे, आयुर्वेदिक सल्ला आणि निसर्गोपचाराबाबत माहिती दिली जाईल. यामुळे योग जगभरात लोकप्रिय होण्यास मदत होईल असं रामदेव बाबांनी म्हटले आहे.
पतंजलीची ही केंद्रे डिजिटल अॅप्स आणि इतर काही उपकरणांचा वापर करून घरबसल्या आरोग्यावर लक्ष ठेवतील. कंपनी 2027 पर्यंत तिच्या चार कंपन्यांची शेअर बाजारात लिस्टिंग करण्याची योजना आखत आहे. यांचे मार्केट कॅप 5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. याचे कारण म्हणजे हेल्त प्रोडक्ट्सचे मार्केट दरवर्षी 10 ते 15 टक्के दराने वाढत आहे. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
पतंजलीने मार्केटिंगबाबत खास योजना आखली आहे. कंपनीने 2025 मध्ये डिजिटल स्पेसवर लक्ष केंद्रित केले आहे. तरुणांना टार्गेट करण्यासाठी YouTube शॉर्ट्स, इंस्टाग्राम रील्स आणि सोशल मिडिया इन्फ्लुएंसरच्या मदतीने प्रमोशन सुरु करण्यात आले आहे. आयुर्वेदिक आरोग्य उत्पादनांची ऑनलाईन विक्री वाढवण्यासाठी SEO आणि कंटेंट मार्केटिंगचा वापर केला जात आहे.
त्याचबरोबर, कंपनी कच्चा माल वाढवण्यासाठी आणि उत्पादनांच्या किंमती कमी ठेवण्यासाठी नवीन कारखाने बांधत आहे. यासाठी सेंद्रिय अन्न, हेल्थी वस्तूंची संख्या वाढवत आहे. आत्मनिर्भर भारत मिशनशी संलग्न होऊन शेतकरी सक्षम होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. कंपनी जागतिक विस्तारासाठी, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका आणि कॅनडा सारख्या देशांमध्ये पार्टनरशीप स्थापन करणार आहे.