पेटीएमने घडवून आणली क्रांती, आणले 5 असे फीचर्स ज्याने ऑनलाईन आर्थिक व्यवहार आणखी सोपा!

पेटीएमने आता डिजिटल पेमेंट क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे पाच नवे फीचर्स आणले आहेत. या फीचर्समुळे आता आर्थिक व्यवहार करणे आणखी सोपे होणार आहे.

पेटीएमने घडवून आणली क्रांती, आणले 5 असे फीचर्स ज्याने ऑनलाईन आर्थिक व्यवहार आणखी सोपा!
paytm
| Updated on: Jul 10, 2025 | 7:31 PM

ऑनलाईन बँकिंग, पेमेंट ट्रान्सफर तसेच अन्य आर्थिक व्यवहरा डिजटली करायचे असतील तर पेटीएमचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. आर्थिक व्यवहारांदरम्यान पुरवली जाणारी सुरक्षा, सहज, सोपी हातळणी, तंत्रस्नेही सुविधा तसेच अन्य काही फिचर्समुळे पेटीएम अगदी कमी काळात वेगाने देशभरात प्रसिद्ध झाले. असे असतानाच पेटीएम या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मने नवे पाच फीचर्स आणले आहेत. या नव्या पाच फीचर्समुळे आता डिजिटल व्यवहार आणखी सोपे आणि जलद होणार आहे. तसेच वापरकर्त्यांच्या व्यवहारांची सुरक्षितताही आणखी वाढणार आहे.

पेटीएमने आणखी कोणते पाच फीचर्स आणले?

पेमेंट हिस्ट्रीमधून ट्रान्झिशन्स लपवण्याची किंवा पाहण्याची सोय

पेटीएमने आता एक नवे फीचर आणले आहे. या फीरच्या माध्यमातून पेटीएम वापरणाऱ्याला यूपीआयच्या माध्यमातून केलेले काही विशिष्ट आर्थिक व्यवहार ( स्पेसिफिक यूपीआय ट्रान्झिशन्स) लपवता किंवा ते दिसतील अशी सेटिंग करता येणार आहे. या सुविधेमुळे पेटीएम वापरकर्त्यांना गिफ्ट, खासगी खर्च किंवा गुप्त आर्थिक व्यवहार लपवण्याची सुविधा निर्माण होणार आहे. एखादे ट्रान्झिशन हाईड केले तर तो व्यवहार बॅलेन्स आणि हिस्ट्री या ऑप्शनमध्ये दिसणार नाही. तुम्ही हाईड केलेले असे ट्रान्झिशन्स हे  ‘View Hidden Payments’ या ऑप्शनमध्ये दिसतील.

यूपीआय पेमेंट्स डाऊनलोड करण्याची सोय

पेटीएमने आता यूपीआय ट्रान्झिसन्स डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून पेटीएम वापरकर्त्यांनी त्यांच्या यूपीआय ट्रान्झिशन्सची सर्व माहिती पीडीएफ किंवा एक्सेल फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करता येणार आहे. यामुळे तुमचा खर्च किती होतो? याचा हिशोब ठेवणे सोपे होणार आहे. तसेच आर्थिक ताळेबंद नीट आखता यावा यासाठीही या पर्यायाची मदत होणार आहे.

पर्नलाईज यूपीआय आयडीची सोय

आता पेटीएमने पर्सनलाईज पूपीआय आयडीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायाच्या मदतीने तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हाईड करता येईल. यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीला तुमचा मोबाईल नंबर दिसणार नाही. या फीचरमुळे आता वापरकर्त्यांना name@ptyes किंवा name@ptaxis असे यूपीआय आयडी वापरता येतील. यूपीआय आयडी तयार करताना मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज भासणार नाही.

बॅलेन्स तपासण्याची सोय

पेटीएमवर यूपीआयशी लिंक केलेल्या बँकेच्या खात्यात किती पैसे आहेत, हे पाहता येते. जे-जे बँक खाते यूपीआय खात्याशी लिंक आहेत, त्या सर्वच बँक खात्यांमध्ये किती पैसे आहेत, हे तपासता येणार आहे. वेगवेगळ्या बँकिंग अॅपमध्ये न जाता तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला खात्यात किती पैसे आहेत, ते तपासता येणार आहे.

स्मार्टफोनच्या होमस्क्रीनवर क्यूआर कोड

पेटीएमने आता रिसिव्ह मनी क्यूआर विजेट नावाचे फीचर लॉन्च केले आहे. यामुळे कॅब ड्रायव्हर, डिलिव्हरी एजंट्स तसेच फ्रिलान्सर यांना समोरच्या व्यक्तीकडून पैसे स्वीकारणे सोपे जाणार आहे. या फीचरच्या मदतीने आता थेट स्मार्टफोनच्या होम स्क्रीनवर क्यू आर कोड ठेवता येणार आहे. त्यामुळे पेटीएम अॅप न उघडता विनाविलंब पेमेंट स्वीकारता येईल.

याव्यतिरिक्त, पेटीएम यूपीआय लाइटवर ऑटो टॉप-अप नावाची सुविधा चालू केली आहे. यूपीआयशी लिंक केलेल्या बँक खात्यातील बचत कमी झाल्यावर या ऑटो टॉप अपच्या माध्यमातून बँक खात्यात पैसे आपोआप जमा होतात. लहान, दैनंदिन व्यवहारांसाठी ही सुविधा फायद्याची ठरू शकते.