Paytm Nykaa : गुंतवणूकदार कोट्यवधीला बुडाले, 5 टेक कंपन्यांमधील गुंतवणूक पडली महागात, नायकासह पेटीएमचा मोठा फटका

| Updated on: Nov 23, 2022 | 7:10 PM

Paytm Nykaa : या पाच टेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधींनी बुडवले आहे..

Paytm Nykaa : गुंतवणूकदार कोट्यवधीला बुडाले, 5 टेक कंपन्यांमधील गुंतवणूक पडली महागात, नायकासह पेटीएमचा मोठा फटका
गुंतवणूकदारांना फटका
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : एक वर्षापूर्वी नव्या दमाच्या टेक्नोलॉजी कंपनीचा (Technology Companies) बाजारात दबदबा तयार झाला होता. या कंपन्यांनी शेअर बाजारात (Share Market) धुमाकूळ घातला होता. कंपन्यांमध्ये तगडी गुंतवणूक होत होती. पंरतु, अवघ्या वर्षभरातच टेक कंपन्यांचे वादळ जमिनीवर आले आणि गुंतवणूकदारांना (Investors Lost) कोट्यवधींचा फटका बसला.

Paytm, Nykaa, Zomato, Delivery, Policy bazar या कंपन्यांमध्ये ब्रोकरेज हाऊसेस गुंतवणुकीचा सल्ला देत होते. पण या कंपनीच्या भविष्याविषयी कोणीही चिंतन केले नाही. डोळे झाकून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्याचा मोठा फटका बसला.

आता एकाच वर्षानंतर या कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. केवळ पेटीएममध्येच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 8 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. तर इतर कंपन्यांमधील गुंतवणूकदार ही हवालदिल आहेत.

हे सुद्धा वाचा

पेटीएमचा शेअर बुधवारी 472 रुपयांच्या सर्वात नीचांकी स्तरावर पोहचला आहे. तर गेल्या 16 महिन्यांत पेटीएम, नायका, झोमॅटो, डिलिव्हरी, पॉलिसीबाजार सारख्या कंपनीतील गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

या टेक कंपन्यांमधून गुंतवणूकदार आता बाहेर पडत आहेत. ते शेअरची विक्री करत आहेत. पेटीएमधून सॉफ्टबॅक, नायकातून वीसी फर्म लाईटहाऊस इंडिया फंडने मोठ्या प्रमाणात विक्री सत्र आरंभिले आहे.

या कंपन्यांमधून 525.39 कोटी रुपयांचे 3 कोटी शेअरची विक्री करण्यात आली आहे. प्री-आयपीओ गुंतवणूकदारांसाठी लॉक इन कालावधी समाप्त झाल्यानंतर शेअर विक्री करण्यात आली आहे.

झोमॅटोमध्ये सुरुवातीला गुंतवणूक करणारी उबर टेक्नॉलॉजी या वर्षी ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममधून बाहेर पडली आहे. बुधवारी झोमॅटोचा शेअर 62.15 रुपयांवर व्यापार करत होता.

नायकाचा एक वर्षाचा लॉक-इन कालावधी या 10 नोव्हेंबर रोजी संपला आणि त्याच दिवशी हा स्टॉक तोंडावर पडला. बुधवारी हा शेअर 171.15 रुपयांवर व्यापार करत होता.

या सर्व घडामोडींचा कंपनीच्या व्यवस्थापनावरही परिणाम होत आहे. या कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक, संचालक, संस्थापक यांचेही राजीनामा सत्र सुरु आहे. त्यामुळेही बाजारात खळबळ उडाली आहे.