Petrol diesel price today : मंगळवार आनंदाची बातमी घेऊन आलाय? काय आहे आजचे पेट्रोल आणि डिझेलचे रेट?; घरात बसून असं करा चेक

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याने, आज देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. सरकारी कंपन्यांनी नवे रेट जारी केले आहेत. राजधानी दिल्ली मध्ये पेट्रोल 102.12 रुपये आहे. तर मुंबईत एका लिटरसाठी आज.. जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव..

Petrol diesel price today : मंगळवार आनंदाची बातमी घेऊन आलाय? काय आहे आजचे पेट्रोल आणि डिझेलचे रेट?; घरात बसून असं करा चेक
9 जूनचे पेट्रोल- डिझलचे लेटेस्ट दर किती ?
| Updated on: Jun 09, 2026 | 10:44 AM

मंगळवारचा दिवस देशातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक चांगली , आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट दिसून आली आहे. याच पार्श्वभूमीवर एचपीसीएल (HPCL), बीपीसीएल (BPCL) आणि आयओसीएल (IOCL) या सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आनंदाची बातमी म्हणजे, आजही इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूडचे (Brent crude) दर घसरून प्रति बॅरल 94 डॉलर्सच्या आसपास आले आहेत, तर वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट (WTI) 91 डॉलर्सच्या आसपास ट्रेड करत आहे.

देशात सर्वात स्वस्त इंधन कुठे ?

संपूर्ण देशाबद्दल बोलायचं झालं तर अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरमध्ये इंधन सर्वात स्वस्त दरात उपलब्ध आहे. तिथे प्रति लिटर पेट्रोलचा दर फक्त 88.66 रुपये आहे. तर डिझेल 84.56 रुपये प्रति लिटर दराने विकलं जातंय. याउलट, आंध्र प्रदेशातील चित्तूरमधील नागरिकांना पेट्रोल-डिझेलसाठी सर्वाधिक किंमत मोजावी लागत आहे. तिथे 1 लीटर पेट्रोल 118.34 रुपयांना तर 1 लीटर डिझेल हे 106.06 रुपयांना विकलं जातंय. विविध राज्यांमधील स्थानिक करांचा इंधनाच्या किमतींवर किती मोठा परिणाम होतो हेही यातून स्पष्ट होतंयय

महानगरांत इंधनाचे लेटेस्ट रेट्स

देशातील प्रमुख महानगरांमधील रहिवाशांच्या बजेचचा विचार करता, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर 102.12 रु रुपये, तर डिझेलचे दर प्रति लिटर 95.20 रुपये या पातळीवर स्थिर आहेत. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लोकांना पेट्रोलसाठी प्रति लिटर 111.21१ रुपये मोजावे लागत आहेत, तर डिझेलची किंमत प्रति लिटर 97.83 इतकी आहे. याचप्रमाणे चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 107.77 रुपये आणि डिझेलचे दर 99.55 रुपये प्रति लिटर वर कायम आहेत. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 113.51 रुपये आणि डिझेलचा दर 99.82 रुपये प्रति लिटर इतका आहे. तसेच, चंदीगडमध्ये पेट्रोलचा भाव 101.53 रुपये व डिझेलचा दर 89.63 रुपये प्रति लिटर इतका आहे.

उत्तर प्रदेशमध्ये राजधानी लखनऊ मध्ये पेट्रोल 102.05 रुपये तर डिझेल 99.28 रुपयांना आहे. अयोध्या मध्ये ते क्रमशः 102.4 रुपये आणि 97.87 रुपये है. राजस्थानमधील जयपूरमध्ये पेट्रोलचा दर 112.66 आणि डिझेलचा दर 97.78 रुपये आहे. मध्ये प्रदेशच्या भोपाळध्ये 1 लिटर पेट्रोल हे 114.65 रुपये आणि डिझेलसाठी 99.74 रुपये मोजावे लागतात. इंदौरमध्ये असाच काहीस दर आहे. छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 107.96 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 101.17 रुपये इतका आहे.

शहर राज्य / केंद्र शासित प्रदेश पेट्रोलचे दर (₹/लीटर) डिझेलचे दर (₹/लीटर)
पोर्ट ब्लेयर अंदमान-निकोबार 88.66 84.56
चित्तूर आंध्र प्रदेश 118.34 106.06
दिल्ली दिल्ली 102.12 95.20
मुंबई महाराष्ट्र 111.21 97.83
चेन्नई तमिलनाडु 107.77 99.55
कोलकाता पश्चिम बंगाल 113.51 99.82
चंदीगड चंदीगड 101.53 89.63
लखनऊ उत्तर प्रदेश 102.05 99.28
अयोध्या उत्तर प्रदेश 102.40 97.87
गोरखपुर उत्तर प्रदेश 102.13 95.62
आगरा उत्तर प्रदेश 101.54 95.02
प्रयागराज उत्तर प्रदेश 101.82 95.33
जयपुर राजस्थान 112.66 97.78
भरतपुर राजस्थान 112.43 97.54
बीकानेर राजस्थान 114.15 99.29
पटना बिहार 112.70 99.87
अररिया बिहार 115.07 101.08
भोपाळ मध्य प्रदेश 114.65 99.74
इंदौर मध्य प्रदेश 114.61 99.70
गुना मध्य प्रदेश 115.44 100+
रायपुर छत्तीसगड 107.96 101.17
बिलासपुर छत्तीसगड 108.76 102.02
बीजापुर छत्तीसगड 109.69 102.99

घरबसल्या जाणून घ्या लेटेस्ट दर

जर तुम्ही इंडियन ऑइल (IOC) चे ग्राहक असाल, तर ‘RSP’ टाईप करून 9224992249 या क्रमांकावर SMS पाठवा, तुम्हाला पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेता येतील. तर भारत पेट्रोलियम (BPCL) चे ग्राहक 9223112222 या क्रमांकावर SMS पाठवू शकतात, आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) चे ग्राहक ‘HPPRICE’ हा संदेश 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून लेटेस्ट दर जाणून घेऊ शकतात. मात्र या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या शहराचा कोड (city code) देखील नमूद करावा लागेल. तसेच इंधनाच्या दराची ही माहिती संबंधित तेल कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइट्सवर सहज उपलब्ध असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us