Petrol-Diesel Price: टॅक्स आला अर्ध्यावर…1 मे रोजी आनंदवार्ता, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
1 May 2026 Big Changes: पाच राज्यांचे निकाल जाहीर होताच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकण्याची भीती व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. टॅक्स आता अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

1 May 2026 Big Changes: आज 1 रोजी पेट्रोल-डिझेलविषयी एक मोठा बदल झाला आहे. मध्य-पूर्वेतील तणावामुळे जागतिक बाजारात इंधनाच्या किंमतीत चढउतार दिसत आहे. त्यातच केंद्र सरकारने एका मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या आणि बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने डिझेलवर करात मोठी कपात केली आहे. तर विमानाच्या इंधनावरील करात कपात केली आहे. या घडामोडींमुळे तुमच्या खिशावरील ताण कमी होणार का?
Diesel वरील करात कपात
केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवर लावण्यात आलेला विंडफॉल टॅक्ससाठी (Windfall Tax) नवीन दर जाहीर केले आहेत. कालपर्यंत कर 55.5 प्रति लिटर होता. आज हा कर कमी करून केवळ 23 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. म्हणजे या करात अर्ध्यांहून अधिकची कपात करण्यात आली आहे. विमान इंधनात (ATF) कपात करण्यात आली आहे. फ्लाईट फ्युएल टॅक्स 42 रुपयांहून आता 33 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. तर पेट्रोलवर पूर्वीप्रमाणेच कोणताही कर (Zero Duty) आकारला जाणार नाही.
ग्राहकांना फायदा काय?
या घडामोडींचा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर काय परिणाम होईल असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. हा कर कंपन्यांच्या अतिरिक्त नफ्यावर लावण्यात येतो. टॅक्स कपात झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांचा खर्च कमी होईल. पेट्रोल पंपावर लागलीच भाव घसरणार नाहीत. पण यामुळे बाजारात पुरवठा अधिक प्रमाणात वाढेल. तर किंमती स्थिर असल्याचा फायदाही ग्राहकांना मिळेल. तर भविष्यात इंधनाच्या किंमती कमी होण्याची शक्यता सुद्धा आहे.
काय आहे विंडफॉल कर?
बाजारातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा फायदा होऊन कंपन्यांचा नफा वाढतो. कंपन्यांना छप्परफाड नफा होतो. तर सरकार त्या नफ्यातील एक वाटा कराच्या रुपाने घेते. त्यालाच विंडफॉल कर असे म्हणतात. या विंडफॉल टॅक्सची प्रत्येक 15 दिवसात समीक्षा करण्यात येते. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा फरक पडणार नसला तरी दर वाढले. तर त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर या कपातीमुळे होणार नसल्याचे मानले जात आहे.