AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Iran Update : इराणला वाकवण्यासाठी अमेरिकेने बाहेर काढलं आपलं खास अस्त्र डार्क ईगल, या शस्त्रामध्ये असं काय खास?

US-Iran Update : इराण अमेरिकेला भिडतोय. महिन्याभरापेक्षा जास्त चाललेल्या युद्धात इराणने अमेरिकेसमोर शरणागती पत्करली नाहीच. उलट सीजफायर घडवून आणण्यासाठी ट्रम्प यांना टोकाच्या धमक्या द्याव्या लागल्या. आता पुन्हा एकदा युद्ध सुरु होण्याचे संकेत आहेत. यावेळी अमेरिकेने इराणला वाकवण्यासाठी आपलं खास डार्क ईगल अस्त्र बाहेर काढलं आहे.

US-Iran Update : इराणला वाकवण्यासाठी अमेरिकेने बाहेर काढलं आपलं खास अस्त्र डार्क ईगल, या शस्त्रामध्ये असं काय खास?
Dark eagle missile systemImage Credit source: X/US Centcom
| Updated on: May 01, 2026 | 11:47 AM
Share

अमेरिका-इराण युद्धात सीजफायर लागू आहे. खरंतर या काळात युद्धावर तोडगा निघायला पाहिजे होता. पण अजून असं काही घडलेलं नाही. उलट पुन्हा लवकरच युद्ध सुरु होईल असे संकेत मिळत आहेत. अमेरिकेने आपलं सर्वात आधुनिक शस्त्र डार्क ईगल मध्य पूर्वेत तैनात करण्याची तयारी सुरु केली आहे. हे शस्त्र म्हणजे अमेरिकन सैन्याची पहिली हायपरसोनिक मिसाइल सिस्टिम आहे. अधिकृतरित्या हे अमेरिकेचं लॉन्ग रेंज हायपरसोनिक वेपन आहे. अलीकडेच यूएस सेंट्रल कमांडने पेंटागनकडे ही मिसाइल सिस्टिम मध्य पूर्वेत पाठवण्याची विनंती केली होती. इराणच्या बॅलेस्टिक मिसाइल लॉन्चरवर हल्ला करण्यासाठी खास हे शस्त्र मागवण्यात आलं आहे.

अमेरिकेची शस्त्रांची रेंज पोहोचणार नाही अशा ठिकाणी इराणने आपले ट्रान्सपोर्टर इरेक्टर लॉन्चर नेऊन ठेवले आहेत. विद्यमान प्रिसीजन स्ट्राइक मिसाइलची मारक क्षमता 500 किलोमीटर आहे. अशावेळी डार्क ईगलची गरज पडली आहे. डार्क ईगल एक हायपरसोनिक मिसाइल आहे. ध्वनीपेक्षा पाच पट जास्त वेगाने हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्याच्या दिशेने झेपावते. 6174 किलोमीटर प्रतितास मिसाइलचा वेग आहे. याची रेंज 2,780 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. या मिसाइलमध्ये एक ग्लाइड बॉडी आहे. हवेत पूर्णपणे अनपेक्षितपणे हे मिसाइल गिरक्या घेऊ शकतं.

हे मिसाइल खास का बनवण्यात आलय?

सामान्य मिसाइलपेक्षा याचा वेग जास्त आहे. शत्रुचे रडार, एअर डिफेन्स सिस्टिम या मिसाइलला पकडू शकत नाही. अंडरग्राऊंड सुविधा, जमिनीखाली कमांड सेंटर आणि चालते-फिरते मोबाइल लॉन्चर नष्ट करण्यासाठी या मिसाइलची रचना करण्यात आली आहे.

पुन्हा युद्धासाठी तिन्ही देश सज्ज

फेब्रुवारी 2026 च्या अखेरीस ऑपरेशन एपिक फ्युरीची सुरुवात झालेली. इराण विरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर मिसाइल, ड्रोन्स, नौदल तळ आणि सैन्य ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. इराणकडे अजून किती मिसाइल स्टॉक शिल्लक आहे, याची कल्पना नाहीय. पुन्हा युद्धासाठी तिन्ही देश सज्ज आहेत. सध्या धमक्यांचं सत्र सुरु आहे. या युद्धात अमेरिका-इराणला अजून आपलं उद्दिष्टय साध्य करता आलेलं नाही. इराणमध्ये ना सत्ता बदल झाला, ना त्यांचं संवर्धित युरेनियम ताब्यात घेता आलं.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल