AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grey Hair : पांढरे केस लपवण्यासाठी डाय नको! घरच्या घरी बनवा हा नैसर्गिक हेअर मास्क

आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना जाणवते. केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकवण्यासाठी बाजारातील हेअर डायरऐवजी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता. जाणून घ्या, पांढऱ्या केसांची समस्या कमी करण्यासाठी कोणता हेअर मास्क वापरता येईल.

Grey Hair : पांढरे केस लपवण्यासाठी डाय नको! घरच्या घरी बनवा हा नैसर्गिक हेअर मास्क
hair mask
| Edited By: | Updated on: Nov 04, 2026 | 4:24 PM
Share

Hair Mask: आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना जाणवते. केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकवण्यासाठी बाजारातील हेअर डायरऐवजी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता. जाणून घ्या, पांढऱ्या केसांची समस्या कमी करण्यासाठी कोणता हेअर मास्क वापरता येईल.

आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः तरुण मुला-मुलींना या समस्येचा सामना करावा लागत आहे. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक जण मेहंदी किंवा केमिकलयुक्त हेअर कलरचा वापर करतात. मात्र, वारंवार हेअर कलर किंवा डाय लावल्याने केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काहींना केस गळणे, केस कोरडे होणे अशा समस्यांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी अनेक जण घरगुती उपाय शोधतात. तुम्हाला सुद्धा घरगुती उपाय करायचा असेल तर तुम्ही असाच एक हेअर मास्क ट्राय करू शकता. हा मास्क घरी सहज तयार करता येतो. जाणून घेऊया, हा हेअर मास्क बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि तो केसांना कसा लावायचा.

पांढऱ्या केसांसाठी वापरून पाहा हा हेअर मास्क कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या जाणवत असेल, तर केसांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शरीराला आवश्यक पोषक घटक न मिळणे, तसेच केमिकलयुक्त शॅम्पू आणि तेलांचा अतिवापर यांसारख्या कारणांमुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी तुम्ही हा हेअर मास्क वापरून पाहू शकता. हा मास्क घरी कसा तयार करायचा, ते जाणून घेऊया.

हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहेत या गोष्टी – – १०० ग्रॅम नारळाचे तेल – २० ग्रॅम काळे जिरे (कलौंजी) – एक मूठभर कढीपत्ता – दोन चमचे मेथी दाणे

असे बनवा हेअर मास्क हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका पॅन किंवा कढईत खोबरेल तेल गरम करा. आता आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तेलात टाकून भाजून घ्या. त्यांचा रंग डार्क होईपर्यंत ते नीट भाजा. ते काळे पडले तरी चालेल. आता या सर्व गोष्टींची पेस्ट बनवा.

कसा लावावा हेअर मास्क आता तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांवर नीट लावून घ्या. साधारण ३० मिनिटे हा मास्क केसांवर राहू द्या. त्यानंतर सल्फेट-फ्री शॅम्पूने केस धुवा. टीप – घरगुती उपाय असला तरी वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.

Follow Us
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?