AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adinath Kothare : रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवून….आदिनाथने सांगितला ‘रामायण’ सिनेमात काम करण्याचा अनुभव

रामायण काही दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायणात बॉलिवू़डपासून दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीपर्यंत सर्वच लोकांनी काम केले आहे. त्यात मराठी चित्रपटसृष्टीतील आदिनाथ कोठारे याने देखील भरताची भूमिका साकारली आहे. एक मुलाखतीत त्याने रामायणातील कलाकारांसोबत काम करण्याच्या त्या अनुभवाबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे.

Adinath Kothare : रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवून....आदिनाथने सांगितला 'रामायण' सिनेमात काम करण्याचा अनुभव
ramayan aadinath kothare bharat Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 04, 2026 | 4:18 PM
Share

मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या रामायण या बहुचर्चित चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो भगवान श्रीरामांच्या धाकट्या भाऊ भरत याची भूमिका साकारत आहे. मात्र आदिनाथला ही भूमिका सहज मिळालेली नाही. एका चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशनमध्ये त्याला मुख्य भूमिका मिळाली नाही. पण त्याच ऑडिशनमुळे त्याच्यासाठी रामायणाचे दरवाजे खुलले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदिनाथने ही गोष्ट सांगितली आहे.

आदिनाथने सांगितले की, त्याने यापूर्वी दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या निर्मितीतील ‘तारला’ या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. या चित्रपटासाठी त्याची निवड अंतिम टप्प्यापर्यंत झाली होती. मात्र त्याला मुख्य भूमिका मिळाली नाही. तरीही या ऑडिशनमधून निते तिवारी यांच्यापर्यंत त्याच काम पोहोचलं. त्यानंतर ‘रामायण’ साठी त्याने ऑडिशन दिले. त्याचं काम आणि अभिनयाची क्षमता लक्षात घेऊन नितेश तिवारी यांनी त्याला भरताच्या भूमिकेसाठी निवडलं.

आदिनाथने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक खास अनुभवही सांगितला. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्याला या चित्रपटाची भव्यता लक्षात आली. अयोध्येतील एका प्रसंगाचं चित्रिकरण सुरू होतं. त्यावेळी रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि अरूण गोविल यांच्यासह संपूर्ण कलाकरा मंडळी सेटवर उपस्थित होती. तो प्रसंग पूर्ण झाल्यानंतर आपण किती मोठ्या प्रकल्पाचा भाग आहोत, याची जाणीव झाल्याचं त्याने सांगितलं.

या चित्रपटाच्या सेटवर रणबीर कपूरनेही आदिनाथला मदत केली, असे आदिनाथने सांगितले. एका प्रसंगाच्या शूटिंगवेळी आदिनाथला एक वेगळ्या प्रकारे सीन शूट करण्याची कल्पना सूचली. मात्र दिग्दर्शकाच्या सूचना पाळाव्या की स्वत:ची कल्पना मांडावी, याबाबत तो थोडा गोंधळलेला होता. त्यावेळी रणबीरने खांद्यावर हात ठेवून त्याला त्याची कल्पना मांडण्यास सांगितले, तसा तो सीन शूटही केला. नितेश तिवारींना देखील आदिनाथची ती कल्पना आवडली. या प्रसंगमामुळे सेटवरचा संकोच दूर झाला आणि तो अधिक मोकळेपणाने काम करू लागला. असे आदिनाथने सांगितले.

आदिनाथने ‘रामायण ‘ च्या सेटवरील शिस्तीचंही विशेष कौतुक केलं. सेटवर मोबाईल फोन वापरण्यास परवानगी नव्हती. चित्रीकरण सुरू नसतानाही प्रत्येक जण शिस्त पाळत असे. त्यामुळे हा सेट एखाद्या मंदिरासारखा पवित्र वाटायचा.असं त्याने सांगितलं. दिग्दर्शक नितेश तिवारी प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देतं होते असेही आदिनाथने सांगितले.

नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आदिनाथ कोठारे भरातची भूमिका साकारत असून, हा त्याच्या कारकिर्दितील महत्त्वाचा प्रोजेक्ट मानला जात आहे.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण