AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

America Election Result : भारतावर 500 टक्के टॅरिफ लावण्याची द्यायचा धमकी, त्यांच्याच बहिणीचा दारूण पराभव, ट्रम्पनाही धक्का!

लिंडसे ग्रॅहम या मतदारसंघातून पाच वेळा सिनेटर राहिलेले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान लिंडसे ग्रॅहम यांनी अनेकवेळा भारताविरोधात आगपाखड केली होती.

America Election Result : भारतावर 500 टक्के टॅरिफ लावण्याची द्यायचा धमकी, त्यांच्याच बहिणीचा दारूण पराभव, ट्रम्पनाही धक्का!
donald trump and darline grahamImage Credit source: tv9 marathi, the new yorker
| Updated on: Nov 04, 2026 | 4:16 PM
Share

America Election : सध्या अमेरिकात मध्यवधी निवडणुकीचा निकाल लागतोय. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी रिपब्लिक पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण अनेक महत्त्वाच्या जागांवर या पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. हा निकाल म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही धक्का मानला जातोय. या निवडणुकीत भारतीय वंशाचेही काही उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, जो नेता भारतावर तब्बल 500 टक्के टॅरिफ लावण्याची भाषा बोलायचा, त्या नेत्याच्या कुटुंबालाही या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलाय.

डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का

विशेष म्हणजे संबधित जागा ही ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला होती. तरीही या जागेवर ट्रम्प यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. या जागेचे नाव साऊथ कॅरोलिना असे आहे. येथे डेमोक्रॅटिक पक्षाने अॅनी अँड्र्यूज यांना तिकीट दिले होते. तर रिपब्लिकपन पक्षाने सिनेटर डार्लिन ग्रॅहम यांना उभे केले होते. अँड्र्यूज यांनी ग्रॅहम यांना पराभूत केले. ग्रॅहम या रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते लिंडसे ग्रॅहम यांच्या बहीण आहेत. लिंडसे ग्रॅहम यांनी अनेकवेळे भारतविरोधी भूमिका घेतलेली आहे.

20 वर्षांपासून मतदारसंघ रिपब्लिकनकडे

एनबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार डेमोक्रॅटिक पक्षाच्या अॅनी अँड्र्यूज या पेडियाट्रिशियन आहेत. त्यांनीच डार्लिन ग्रॅहम यांचा पराभव केलाय. साऊथ कॅरोलिना हा मतदारसंघ गेल्या 20 वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाकडे होता. परंतु आता यावेळी येथे डेमोक्रॅटिक पक्षाचा सिनेटर असेल.

लिंडसे ग्रॅहम यांची भारताविषयी काय भूमिका होती?

लिंडसे ग्रॅहम यांचे जुलै 2026 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर तेथील गव्हर्नर हेन्री मॅकमास्टर यांनी डार्लिन ग्रॅहम यांची साऊथ कॅरोलिना यांची सिनेटर म्हणून नियुक्ती केली होती. लिंडसे ग्रॅहम या मतदारसंघातून पाच वेळा सिनेटर राहिलेले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान लिंडसे ग्रॅहम यांनी अनेकवेळा भारताविरोधात आगपाखड केली होती. भारत रसियाकडून कच्चे तेल खरेदी करून रशियाला युद्धात अप्रत्यक्षपणे मदत करत आहे, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. तसेच भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहिला तर अमेरिकेकडून भारतावर 500 टक्के टॅरिफ लावला जाऊ शकतो, अधी धमकीही त्यांनी दिली होती. दरम्यान, आता त्यांच्या बहिणीचाही या निवडणुकीत पराभव झालाय.

Follow Us
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?