मोठी बातमी! राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या नेत्यानं सोडली साथ, काँग्रेसमध्ये मोठा पक्षप्रवेश
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मनसेला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली असून, काँग्रेसमध्ये मोठा पक्ष प्रवेश झाला आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मनसेला मोठा धक्का बसला आहे. रणजीत शिरोळे यांनी मनसेची साथ सोडली आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. हा पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस म्हणून देखील रणजीत शिरोळे यांनी पक्षाचं काम केलं होतं. मात्र त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 2009 मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
