Petrol-Diesel Price Today: खासगी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा भाव वाढवला, नायरा, जिओने ग्राहकांचा ‘बीपी’ वाढवला, सरकारी कंपन्यांचा एक लिटरचा दर काय?

Petrol Diesel Prices Today 13 October 2026 : खासगी कंपन्यांच्या पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा भाव तुम्हाला वाढल्याचे जाणवले असेल. आज HP, Indian Oil सारख्या सरकारी कंपन्यांच्या पंपावर एक लिटर इंधनाचा काय आहे भाव?

Petrol-Diesel Price Today: खासगी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा भाव वाढवला, नायरा, जिओने ग्राहकांचा बीपी वाढवला, सरकारी कंपन्यांचा एक लिटरचा दर काय?
एक लिटरचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव काय
| Updated on: Oct 13, 2026 | 1:50 PM

Petrol-Diesel Price Today: देशात नायरानंतर जिओ-बीपी या दोन प्रमुख खासगी तेल विपणन कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केली. नायरा पंपावर 3 ऑक्टोबर 2026 रोजी पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी महागले. तर 11 ऑक्टोबर रोजी जिओ-बीपीने हाच कित्ता गिरवला. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा भाव तीन रुपयांनी वाढवला. यामुळे ग्राहकांचा खिसा कापल्या गेला. तर इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, एचपी या सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप इंधनाचे दर वाढवलेले नाहीत. यामुळे खासगी आणि सरकारी इंधन कंपन्यांच्या दरात स्पष्ट फरक दिसत आहे. तर सरकारी तेल विपणन कंपन्या दरवाढ करण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

खासगी कंपन्यांचे इंधन का भडकले?

Loading...

जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या आणि शुद्धीकरण करण्यात आलेल्या इंधनाच्या किंमती वधारल्या आहेत. वाढत्या खर्चामुळे आणि आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी खासगी कंपन्यांनी इंधन दरवाढीचा निर्णय घेतला. नायरासह जिओ-बीपी या खासगी कंपन्यांच्या इंधन दरांवर जागतिक बाजारातील घडामोडींचा तात्काळ प्रभाव दिसतो. क्रूड ऑईलच्या किंमती वधारल्याने पेट्रोलियम उत्पादनावर परिणाम दिसतो. खासगी कंपन्यांनी लिटरमागे पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी महाग केले.

चार प्रमुख शहरातील भाव काय?

13 ऑक्टोबर 2026 रोजी प्रमुख शहरातील आजचा भाव काय

नवी दिल्ली: पेट्रोल 102.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर

मुंबई: पेट्रोल 111.18 आणि डिझेल 97.83 रुपये प्रति लिटर

कोलकाता: पेट्रोल 113.47 आणि डिझेल 99.82 रुपये प्रति लिटर

चेन्नई: पेट्रोल 107.77 आणि डिझेल 99.55 रुपये प्रति लिटर

किंमती जाणून घ्या एका SMS वर

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.

इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.

बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.

त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.

त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us