AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : पेट्रोलियम कंपन्या कधी नव्हे ते नफ्यात, पेट्रोल-डिझेलची येईल कधी स्वस्ताई

Petrol Diesel Price Today : पेट्रोलियम कंपन्या गेल्या मार्च महिन्यापासून नफ्यात आहे. आता हा नफा फार मोठा नसला तरी त्याचा परिणाम भारतीय बाजारात नक्कीच दिसून येईल. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय

Petrol Diesel Price Today : पेट्रोलियम कंपन्या कधी नव्हे ते नफ्यात, पेट्रोल-डिझेलची येईल कधी स्वस्ताई
काय आहे आजचा भाव
| Updated on: Apr 22, 2023 | 8:38 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय तेल वितरण कंपन्यांना मार्च महिन्यापासून नफ्याचे गणित साधता आले आहे. यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांना नफा झाला होता. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड केली होती. केंद्र सरकारने कंपन्यांना कोट्यवधींची नुकसान भरपाई दिली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल (Crude Oil) किंचित वधारले. सकाळी तेल कंपन्यांनी भाव जाहीर केले. येत्या काही दिवसांत जागतिक पातळीवर मनोमिलन झाल्यास तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय मागे ही घेण्यात येऊ शकतो. आज अक्षय तृतीया आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या भावात (Petrol-Diesel Price) कपात झाली का?

मार्च ठरला फायद्याचा इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांनी चालू तिमाहीत, जानेवारी ते मार्च महिन्यात फायद्याचे गणित जुळवून आणले. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीवर सरासरी 1.2 रुपये प्रति लिटर मार्जिन मिळविल्याचा अंदाज आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपन्यांना 3 रुपये प्रति लिटर तोटा सहन करावा लागला होता. तर त्यापूर्वी एप्रिल-डिसेंबर कालावधीत प्रति लिटर 8.9 रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याचे ICICI सिक्युरिटीजने स्पष्ट केले होते.

कच्चा तेल वधारले आज कच्चा तेलाच्या किंमतीत 22 एप्रिल रोजी दरवाढ झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) आज किंचित वधारुन 77.87डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) वाढ होऊन 81.66 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.64 आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.85 आणि डिझेल 92.37 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती