
PhonePe Firecracker Insurance Plan : दिवाळीसाठी एक खास विमा प्लान समोर आला आहे. फोनपे कंपनीने हा विमा प्लान आणला आहे. या योजनेत, कुटुंबातील पती-पत्नी, कमीत कमी दोन मुलांना विमा संरक्षण मिळते. आता सणासुदीचे दिवस आहेत. नवरात्री सुरू आहे. दसरा येईल. त्यानंतर दिवाळी येईल. यावेळी दिवाळी पाच दिवसांची असेल. 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या दरम्यान दिवाळी असेल. तर 20 ऑक्टोबर रोजी पूजन होईल. या काळात फटक्यामुळे इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मायक्रो इन्शुरन्सची मागणी वाढत आहे. PhonePe सारख्या डिजिटल कंपन्या त्यासाठी नवीन ऑफर घेऊन आल्या आहेत.
दिवाळीत मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात येते. अनेक जण तर फटाक्यांची लड लावतात. अनार, भूईचक्री, कानठळ्या बसवणारे फटाके फोडल्या जातात. या आनंदाला कधी कधी गालबोट लागते. फटाक्यामुळे शरीराला मोठे नुकसान होते. अशावेळी मोठी इजा झाल्यास मोठा खर्च लागू शकतो. अशावेळी विम्याची गरज भासते. ऑनलाइन पेमेंट ॲप फोनपे (PhonePe) कंपनीने स्पेशल इन्शुरन्स आणला आहे.
11 रुपयांमध्ये 25 हजारांचे विमा संरक्षण
फोनपे कंपनीने या प्लानचे नाव फायरक्रॅकर्स इन्शुरन्स (PhonePe’s Firecracker Insurance) असं आहे. हा विमा अवघ्या 11 रुपयांत ऑनलाईन खरेदी करता येतो. फटक्यामुळे अपघात झाल्यास 25 हजार रुपयांचा विमा संरक्षण देण्यात येते. हा प्लान गेल्यावर्षी सुद्धा कंपनीने आणला होता. त्यावेळी हा विमा 9 रुपयांत देण्यात येत होता. आता त्यात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा विमा 11 रुपयांमध्ये देण्यात येत आहे.
किती दिवसांसाठी हा विमा?
12 ऑक्टोबर रोजीपूर्वी पॉलिसी खरेदी करणाऱ्यांना त्याच दिवशीपासून विमा संरक्षण सुरू होईल. हा विमा फेस्टिव्ह सीजनपर्यंत सुरू असेल. त्यानंतर खरेदी करण्यात आलेला विमा 11 दिवसांसाठी सुरु असेल. याचा अर्थ 11 रुपयांच्या या खास विमा प्लानमध्ये विमाधारकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जवळपास 11 दिवसांसाठी 25 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.
अशी करा खरेदी ?