खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; त्वरित महत्त्वाची कामे आटोपून घ्या, अन्यथा मदतीला मुकाल

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा होणार असून त्याआधी पात्र लाभार्थ्यांनी महत्त्वाची कामे आटोपून घ्यावीत.

खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; त्वरित महत्त्वाची कामे आटोपून घ्या, अन्यथा मदतीला मुकाल
FARMER
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 9:56 AM

देशभरातली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचे 23 हप्ते मिळाले आहेत. आता लवकरच 24 वा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात 24 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या लक्ष 24 व्या हप्त्याकडे लागलं आहे.

शेतकरी वर्ग मोठ्या आतुरतेने शेतकरी सन्मान निधीच्या योजनेचे पैसे कधी येणार, याची प्रतीक्षा करत आहेत. या योजनेविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परंतु शेतकऱ्यांनी पैसे मिळवण्यासाठी काही महत्वाच्या बाबी त्वरीत पूर्ण केल्या पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जून 2026 रोजी पश्चिम बंगालच्या तारकेश्वरमधून 23 वा हप्ता जारी केला. त्यानंतर एका झटक्यात 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18880 रुपये ट्रान्सफर करण्यात आले. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योनजेचे दर चार महिन्यांनी दिले जातात. जूननंतर आता या योजनेचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. परंतु सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

योजनेचे पैसे नेमकं कोणाला मिळतात ?

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना 6000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. वर्षभरात तीन वेळा 2000-2000 रुपयांचा हप्ता हा लिंक केलेल्या बँक खात्यात Direct benefits transfer अंतर्गत दिला जातो. 2019 साली ही योजना सुरू झाली. आतापर्यंत 4.46 लाख कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.

तीन कामे आधी करावी

सरकारने लाभ रखडू नये, यासाठी काही नियमांचं पालन करण्याचे आदेश शेतकऱ्यांना दिले आहेत .त्यामुळे 24 वा हप्ता येण्याआधी शेतकऱ्यांनी या गोष्टी कराव्यात. शेतकऱ्यांनी E-kyc पूर्ण करावी. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी E-kyc करणे अनिवार्य आहे. तुमचं बँक खाते आधारशी लिंक करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला DBT अंतर्गत पैसे मिळतील. पीएम-किसान पोर्टलवर जमिनीच्या नोंदीची पडताळणी करून घ्यावी. विशेष म्हणजे या योजनेचा एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेतल्याचे सिद्ध झाल्यास सरकार हप्ता थांबवू शकते. त्यामुळे कुटुंबांतील एकाहून अधिक सदस्यांनी योजनेचा लाभ घेणे टाळावे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us