डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
बुलढाण्यातील 75 वर्षीय शेतकरी जगदेव काकडे यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. 50 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे त्यांचे चार एकर सोयाबीन पीक अक्षरशः करपले आहे. पेरणी, खतपाणी आणि मशागतीवर केलेला 70 हजार रुपयांचा खर्च वाया गेला आहे. घरात एक दाणाही येण्याची शक्यता नसताना कुटुंब आणि नातवंडांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, या चिंतेने त्यांना झोप लागत नाही.
बुलढाणा जिल्ह्यातील 75 वर्षीय शेतकरी जगदेव काकडे हे सध्या भीषण संकटात सापडले आहेत. 50 दिवसांहून अधिक काळ पाऊस न झाल्याने त्यांच्या चार एकर शेतातील सोयाबीन पीक पूर्णपणे करपून गेले आहे. पेरणी, खते आणि मशागतीवर केलेला 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च वाया गेला असून, घरात एक दाणाही येण्याची शक्यता नाही. यामुळे जगदेवराव काकडे यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. मागील कर्जमाफीचा लाभही त्यांना मिळालेला नाही. तीन मुले आणि त्यांची नातवंडे यांच्या उदरनिर्वाहाची आणि शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
या परिस्थितीमुळे त्यांना रात्री झोप लागत नाही. सरकारने एकरी दीड ते दोन लाख रुपयांची मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे, अन्यथा आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मंत्र्यांकडून काजू-बदाम खाण्याच्या बातम्या येत असताना, दुसरीकडे शेतकरी मात्र संकटात सापडले आहेत.
Published on: Sep 22, 2026 11:25 AM
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान

