AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नको तेच घडलं… पाकिस्तानात बुरखाधारींचा नंगानाच, मंत्र्याचं अपहरण, हजारो लोक रस्त्यावर

पाकिस्तानात राजकीय तणाव शिगेला पोहोचला आहे. पेशावरमध्ये बुरखाधारींनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे मंत्री फजल शकूर खान यांचे अपहरण केले. या घटनेच्या निषेधार्थ हजारो पीटीआय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून निदर्शने करत आहेत. इस्लामाबादेत मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांनाही तयारीचे आदेश देण्यात आले आहेत.

नको तेच घडलं... पाकिस्तानात बुरखाधारींचा नंगानाच, मंत्र्याचं अपहरण, हजारो लोक रस्त्यावर
Pakistan political crisisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 11:19 AM
Share

पाकिस्तानातील टेन्शन वाढलं आहे. पेशावरमध्ये बुरखाधारी (मुखवटा घातलेले) लोकांनी कहर केला आहे. या बुरखाधारी लोकांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मंत्री फजल शकूर खान यांचं अपहरण केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. काही बुरखाधारींनी मंत्र्याची गाडी अडवली. कारच्या टायरवर गोळीबार केला. त्यानंतर त्यांना उचलून दुसऱ्या गाडीत टाकलं आणि अज्ञात ठिकाणी घेऊन गेले, असा दावा पीटीआयने केला आहे. या घटनेच्या निषेधार्ध पीटीआयचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. रविवारी इम्रान खान यांच्या पीटीआय पार्टीचं इस्लामाबादेत जोरदार निदर्शने होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हे अटकसत्र सुरू असल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री फजल शकूर खान यांच्या गार्डसने कथितपणे पोलीस चौकशीला विरोध केला. त्यामुळे बुरखाधारी लोकांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर हे अपहरण नाट्य घडल्याचं सांगितलं जातं. कालच इम्रान खान यांच्या तिन्ही बहिणींना घरात झोपलेल्या असताना अटक केली. त्यांना कुठे ठेवलं याची माहिती समोर आलेली नाही. पण त्यामुळे पाकिस्तानात आधीच संतापाची लाट पसरलेली असतानाच त्यात आता मंत्र्याच्या अपहरणाची घटना घडल्याने आणखीनच दहशत निर्माण झाली आहे.

या घटनेने संपूर्ण प्रांतातमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालं आहे. हजारो लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. खैबर पक्ख्तूनख्वाचे माहिती मंत्री शफी जान यांनी ही कारवाई संविधान, कायदा आणि जनादेशावर करण्यात आलेला हा हल्ला आहे, असं म्हटलं आहे.

मंत्र्याचं अपहरण

काही बुरखाधारी आणि शस्त्रास्त्र घेतलेले लोक आले होते. त्यांनी पेशावरच्या मोटरवे टोल प्लाजाजवळ मंत्री फजल शकूर खान यांची गाडी थांबवली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनोळखी लोक मेन हायवेला ब्लॉक करून तिथे बॅरियर लावताना दिसत आहेत.

प्रांतीय विधानसभा आणि पेशावर हायकोर्टाच्या समोर मंत्र्याची गाडी रोखण्यासाठी बुरखाधारी लोकांनी कारच्या टायरवर गोळ्या चालवल्या. या दरम्यान, मलाकंदमध्ये पीटीआयचे प्रमुख नेता आणि आमदार शकील अहमद यांच्याही अपहरणाच्या प्रयत्नाची चर्चा सुरू झाली. त्याचा एक कथित व्हिडीओही समोर आला आहे. हे वृत्त येताच मलाकंद येथील नागरिकांचा भडका उडाला. पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी बुट खैला बायपासवर रास्ता रोको करत हा रस्ताच बंद करून टाकला. त्यामुळे या बायपासवरील वाहतूक ठप्प झाली. निदर्शकांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध नोंदवला. घोषणाबाजी करत सरकारचाही निषेध केला. आमच्या नेत्यांना टार्गेट केलं तर सहन केलं जाणार नाही, असा इशाराच आंदोलकांनी दिला आहे.

रुग्णालयांना आदेश

ड्रॉप साइट न्यूजच्या वृत्तानुसार, इस्लामाबादमध्ये पीटीआयच्या मार्चपूर्वी सरकारकडून रुग्णालयांना काही आदेश देण्यात आले आहेत संभाव्य मानवी संकट येणार आहे. यावेळी असंख्य लोक जखमी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तयार राहा, असे आदेश रुग्णालयांना देण्यात आले आहेत. यावरून रविवारी पाकिस्तानात मोठा राडा होण्याचे संकेत मिळत आहे. दरम्यान, सरकारचे आदेश मिळताच रुग्णालयांनी महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द केल्या आहेत. तसेच सुट्टीवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर ज्वॉईन होण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय जे रुग्ण बरे झाले आहेत, त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं जात आहे.

Follow Us
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले