AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?

भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर… नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 22, 2026 | 10:06 AM
Share

राजकीय दबावामुळे भाजपमध्ये प्रवेशाचा विचार करणारे चिखली विधानसभेचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अखेर काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींनी स्वतः बोंद्रे यांच्याशी संपर्क साधून त्यांना पक्षातच राहण्याचे आवाहन केले. खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून त्रास दिला जात असतानाही काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी उभा असल्याचे राहुल गांधींनी त्यांना सांगितले.

चिखली विधानसभेचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अखेर काँग्रेसमध्येच राहण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या विचारात होते, परंतु राहुल गांधी यांच्याशी झालेल्या दूरध्वनीवरील संभाषणाने त्यांचा निर्णय बदलला. राहुल बोंद्रे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून, तसेच खोट्या चौकशीमध्ये अडकवून त्यांना सातत्याने त्रास दिला जात होता. या राजकीय दबावामुळे त्यांची मानसिकता भाजपमध्ये जाण्याची तयार झाली होती.  मात्र, ही माहिती राहुल गांधींपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ राहुल बोंद्रे यांच्याशी संपर्क साधला. राहुल गांधींनी बोंद्रे यांना धीर देत, “घाबरू नका, दबावाखाली येऊ नका.

आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहात, कोणतीही चूक करू नका,” असे आश्वासक शब्द दिले. राहुल गांधींच्या या शब्दांनी बोंद्रे भावूक झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. काँग्रेस पक्षाने आपल्याला सामाजिक आणि राजकीय वाटचालीत अनेक संधी दिल्या आणि जीवाभावाची माणसे दिली, याची त्यांना आठवण झाली. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला बळ मिळाल्याचे दिसत आहे.

Published on: Sep 22, 2026 10:06 AM

Follow Us